आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुहेरी कर आकारणीवर अर्थमंत्र्यांकडून आश्वासन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दुहेरी कर आकारणीपासून वाचण्याच्या संधीचा फायदा उचलणार्‍या गुंतवणूकदारांना अर्थमंत्रालयाने दिलासा दिला आहे. त्यांच्या चिंतेचे निराकरण संसदेत वित्त विधेयकांवरील चर्चेदरम्यान केले जाईल, मंत्रालयाने सांगितले.

मॉरिशस, सायप्रस व सिंगापूरसारख्या कमी कर आकारणी असलेल्या देशांतून भारतीय बाजारात गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांनी वित्त विधेयकात प्राप्तिकर कायद्याच्या 90 व्या कलमाच्या पाचव्या उपविभागात याबाबत त्रोटक भाषेचा वापर केल्यामुळे चिंता व्यक्त केली आहे. या कायद्यामुळे दुहेरी कर आकारणीतून सवलत मिळवण्यात अडचणी येऊ शकतात, असे या गुंतवणूकदारांना वाटते. शेअर बाजारावरही त्याचा परिणाम दिसून आला होता. वित्त विधेयकावरील चर्चेदरम्यान तोडगा काढण्यात येणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.