आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Venkaiah Naidu Met Congress President Sonia Gandhi

GST साठी बजेट सेशन लवकर, वेंकैया नायडूंनी घेतली सोनिया गाधींची भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - जीएसटी विधेयक पारित करण्‍यासाठी सरकार निश्चित तारेखपेक्षा काही दिवस अगोदर बजट सेशन बोलावू शकते. वेंकैया नायडू यांनी गुरुवारी कॉंग्रेस अध्‍यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घेतली. या संदर्भात त्‍यांनी म्‍हटले, ''इतर पक्ष तयार असतील तर निश्चित तारखेपेक्षा बजेट सेशन अगोदर घेतले जाईल.''
सोनिया- मनमोहन काय म्‍हणाले...
- रिअल इस्‍टेट आणि जीएसटी बजेट पारित करण्‍यासाठी नायडू यांनी सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग यांची मदत मागितली.
- पक्षाच्‍या इतर नेत्‍यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ, असे हे दोघे म्‍हणाल्‍याचे नायडू यांनी सांगितले.
- कॉंग्रेस सकारात्‍मक प्रतिसाद देईल, अशी आशा वेंकैया यांनी व्‍यक्‍त केली.
कॉंग्रेसने उपस्थित केलेले प्रश्‍न सोडवले
- नायडू यांनी सांगितले, जीएसटीवर कॉंग्रेसने तीन प्रश्‍न उपस्‍थ‍ित केले होते. अरुण जेटली यांनी हे तीनही प्रश्‍न सोडवले आहेत.
- रिअल इस्‍टेट बिलाबाबत नायडू यांनी सोनिया यांना सांगितले की याला राज्‍यसभेच्‍या सलेक्‍ट कमिटीकडे पाठवले असून, सरकारने समितीच्‍या सर्व शिफारशी मान्‍य केल्‍यात.
पुढील स्‍लाइडवर वाचा, 'जीएसटी' म्हणजे काय