आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धडाडीचे निर्णय हवेत, शाश्वत उपाय असावेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


देशाच्या अर्थव्यवस्थेची गती थंडावली आहे. विकासचक्र मंदावले आहे. त्याला योग्य दिशेने गती देण्यासाठी निर्णय घेणे, ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. तूट कमी करण्यासाठी आगामी रेल्वे तसेच केंद्रीय अर्थसंकल्पात नेमके काय असावे हे सांगताहेत निर्लेप उद्योग समूहाचे संचालक राम भोगले...

अर्थचक्राला गती देण्यासाठी धडाडीचे निर्णय घ्यावेत. स्थानिक कराचे उच्चाटन व्हावे. जीएसटीची अंमलबजावणी तातडीने व्हावी

वित्तीय तूट भरून काढण्याचे मोठे आव्हान आहे. लघु व मध्यम उद्योगाला उभारी देणे आवश्यक आहे. अनुदान लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. हे सर्व करत असताना एखाद्या क्षेत्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एखाद्या क्षेत्राला बुस्टर डोस देण्याची गरज भासणार नाही, अशा तरतुदींची अपेक्षा आहे.


वित्तीय तूट
अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी धाडसी निर्णय घ्यावे लागतील. यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ठोस तरतुदी करणे गरजेचे आहे. विकासाभिमुख योग्य धोरणाची आवश्यकता आहे. वित्तीय तूट भरून काढण्यासाठी जमा व खर्चाचा योग्य मेळ घालण्याची खरी गरज आहे. शेअर्स विकून महसूल जमा करण्यात अर्थ नाही. महसूल जमा करण्यासाठी यापेक्षा वेगळी योजना तातडीने कार्यान्वित करणे ही काळाची गरज आहे.


रेल्वे
क्रॉस सबसिडीचे धोरण नको. मतांसाठी भाडेवाढ टाळणे धोक्याचे आहे. मालवाहतुकीच्या महागाईला आळा घालावा लागणार आहे. रेल्वेने व्यावसायिक दृष्टीने प्रयत्न करून पैसे कमावण्याचे मार्ग शोधायला हवेत. रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी ठोस तरतूद अपेक्षित आहे.


एमएसएमई क्षेत्र
एमएसएमईवर (सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग) कराचा मोठा बोजा आहे. तो हलका होण्यासाठी योग्य धोरण असावे. मोठ्या उद्योगाप्रमाणे कर्जफेडीच्या सवलती मिळाव्यात. करात सुधारणा करावी. जीएसटीची अंमलबजावणी तातडीने करावी.


अनुदान
कॅश ट्रान्सफरसारख्या मध्यस्थांचे उच्चाटन करणा-या योजना आखाव्यात. सर्व वस्तू बाजारभावाने मिळतील अशी व्यवस्था व्हावी. अनुदान योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी अद्ययावत योजना आखाव्यात.


ऑटो क्षेत्र
या क्षेत्राच्या विकासासाठी योग्य धोरण राबवावे. सर्वच क्षेत्रांसाठी भरीव तरतुदी असाव्यात. सातत्याने बुस्टर डोस लागणार नाही हे पाहावे.