आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीमंत शेतकऱ्यांवर कर का नको : मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्र सरकारकडे कृषीवर कर लावण्याचा अधिकार नाही. मात्र, या विषयी विचारच करू शकत नाही, असेही नसल्याचे मत केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनी शुक्रवारी व्यक्त केले आहे. या मुद्द्यावर सध्या देशात जोरदार चर्चा सुरू असताना त्यांनी मांडलेल्या या मताला महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन दिवसांपूर्वी बुधवारीच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शेतीमधील उत्पन्नावर कर लावण्याचा सरकारची कोणतीच योजना नसल्याचे स्पष्ट केले होते. संविधानामध्ये अधिकार वाटण्यात आले असून, त्यानुसार कृषी उत्पन्नावर कर लावण्याचा अधिकारच केंद्राकडे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. 
 
सुब्रमणियन म्हणाले की, ‘कृषीवर केंद्र सरकार कर लावू शकत नाही, या मताशी मी सहमत आहे. मात्र, संविधानानुसार राज्यांना शेतीवर कर्ज लावण्याचा अधिकार देण्यात आला आहे. मात्र, २९ राज्ये आतापर्यंत अशा पद्धतीचा कर लावू शकलेले नाहीत. त्यांच्यामध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे असा कर लागला नसल्याचे ते म्हणाले.  श्रीमंत आणि गरीब शेतकऱ्यांमध्ये फरक करणे इतके अवघड का आहे? असा प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारांना स्वत:चे उत्पन्न वाढवण्याची चिंता का नाही? जर श्रीमंत शेतकऱ्यांवर कर लागत असेल तर मला यामध्ये काहीही चुकीचे वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे सुब्रमणियन हे केंद्र सरकारचे दुसरे अर्थतज्ज्ञ आहेत, ज्यांनी शेतीवरील उत्पन्नावर कर लावण्यास सहमती दर्शवली आहे. या आधी मंगळवारी नीती आयोगाचे सदस्य बिबेक देबरॉय यांनीदेखील असेच मत व्यक्त केले होते. त्या नंतर या मुद्यावर देशभरात चर्चा सुरू झाली होती.
बातम्या आणखी आहेत...