आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Worker Laws Improvement , Give Facility To Export

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कामगार कायदा सुधारणा, निर्यात सुविधा मिळाव्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मंदावलेल्या अर्थचक्राला गती देणे गरजेचे आहे. यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागले तरी हरकत नाही. निर्यातवाढीसाठी पोषक धोरण हवे. पायाभूत सुविधांच्या विकासाकडे दुर्लक्ष करून भागणार नाही. आगामी अर्थसंकल्पाबाबत चेंबर ऑफ मराठवाडा अँड अ‍ॅग्रिकल्चरचे (सीएमआयए)अध्यक्ष सुनील रायठठ्ठा यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा...


आर्थिक पातळीवरील मरगळ हटवण्यासाठी ठोस तरतुदी असाव्यात. जीएसटीची अंमलबजावणी तातडीने व्हावी.
कंपन्यांच्या डोक्यावरील कराचे ओझे कमी करणा-या गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अर्थात जीएसटीची अंमलबजावणी तातडीने व्हावी. यामुळे करप्रणाली पारदर्शक, सोपी, सुटसुटीत होईल आणि उद्योगावरील प्रशासकीय तणाव दूर होण्यास मदत होईल, अशा तरतुदींची अपेक्षा आहे.


पायाभूत सुविधा
अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पायाभूत सोयी-सुविधांत वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक वाढवणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने अर्थसंकल्पात ठोस व भरीव तरतूद असावी. सर्व भागात पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी ठोस धोरण असावे.
निर्यातदार
निर्यातदारांच्या सुविधांकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्यात यावे. राज्यातील निर्यातदारांना जवाहरलाल नेहरू बंदरात ब-याच असुविधांना सामोरे जावे लागते. या बंदराचे आधुनिकीकरण तातडीने होणे गरजेचे आहे. अर्थसंकल्पात जेएनपीटीच्या आधुनिकीकरणासाठी भरीव तरतूद असावी. येथील असुविधांमुळे राज्यातील उद्योजकांना बराच त्रास सहन करावा लागते. अनेक दिवस माल बंदरात पडून असतो. हे चित्र दूर व्हावे.
एमएसएमई क्षेत्र
एमएसएमईवर (सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग) कराचा मोठा बोजा आहे. तो हलका होण्यासाठी योग्य धोरण असावे. पूर्वीप्रमाणे सर्वच कंपन्यांना इन्व्हेस्टमेंट अलाउन्स पुन्हा एकदा सुरू करावे. त्यामुले एसएमईच्या आधुनिकीकरणाला गती मिळेल.
कंपनी कर
सध्या कंपनी कर (कॉर्पोरेट टॅक्स) खूप आहे. या चढ्या करामुळे कंपन्यांचे कंबरडे मोडले आहे. हा कर कमी जरी करता आला नाही तरी अर्थसंकल्पात कंपनी करात कसलीही वाढ करण्यात येऊ नये.
कामगार कायदा
सध्याचे कामगार कायदे अत्यंत जुने आहेत. दुरुस्ती करून हे कायदे आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे करावेत.तरच जागतिक स्पर्धेत टिकाव लागेल.