आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यंदा विकले जाणार १० कोटी स्मार्टफोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात २० वर्षांत पहिल्यांदाच २०१५ च्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) मोबाइल फोनच्या विक्रीत घट आली आहे. असे असतानाही वर्षअखेरीस मोबाइल बाजार एक लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची आशा आहे. नवीन तंत्रज्ञान आणि चांगल्या फीचरचे फोन खरेदी करणार्‍यांची संख्या वाढल्यामुळे मोबाइल खरेदीचे सरासरी मूल्य २९०० रुपयांहून वाढून ३६०० रुपये होईल.

इंडियन सेल्युलर असोसिएशननुसार (आयसीए) मोबाइलची बाजारपेठ सन २०१५ मध्ये जवळपास ३३ टक्के वाढून एक लाख कोटी रुपये होईल. मोबाइल हँडसेटच्या संख्येत वाढ ८ टक्क्यांपेक्षा कमी होऊन २८ कोटी होऊ शकते. स्मार्टफोनची संख्या ३५ टक्के वाढण्याचा अंदाज आहे. विक्रीमध्ये ऑनलाइन कंपन्यांचा १५ वाटा राहू शकतो. ग्राहकांना विक्रीनंतरची सेवा आणि अ‍ॅसेसरीजच्या उपलब्धतेत देशातील कंपन्या मागे आहेत. सायबर मीडिया रिसर्चच्या अंतिम अहवालानुसार २०१४च्या अंतिम तिमाहीत ६.२ कोटींची मोबाइल विक्री झाली होती. २०१५च्या पहिल्या तिमाहीत त्यात घट होऊन ५.३ कोटी राहिली. आयसीएचे अध्यक्ष पंकज महेंद्रू यांनी पहिल्या तिमाहीत घटलेल्या विक्रीस चिनी नववर्षामुळे या वेळी आयात कमी झाल्याचे कारण सांगितले.

एप्रिल महिन्यात विक्रीत वाढ झाली आहे. आता उद्योगही ग्राहकांची आवड पाहून व्हॉल्युमऐवजी (संख्या) व्हॅल्यूवर (किंमत) लक्ष देत आहेत. तंत्रज्ञानाच्या अपग्रेडेशनमुळे या वर्षी कंपन्यांकडून लाँच होणार्‍या हँडसेट मॉडेलची संख्या कमी राहील. सन २०१४ मध्ये देशात एकूण २६ कोटी हँडसेटची विक्री झाली, त्यात ७ कोटींपेक्षा जास्त स्मार्टफोन होते. सन २०१५ मध्ये २८ कोटी हँडसेट विक्री होण्याची आशा आहे. महेंद्रू यांच्या म्हणण्यानुसार, स्मार्टफोनच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्यामुळे मोबाइल बाजार सन २०१४चा ७५ हजार कोटी रुपयांहून २०१५ मध्ये एक लाख कोटी रुपयांपर्यंत पाेहोचेल. २०१९ पर्यंत देशात मोबाइल हँडसेटचा व्यवसाय ५० कोटी प्रतिवर्ष होईल. आणखी एक बदल होऊ पाहत आहे. देशातील मोबाइल कंपन्या चीनकडून होणारी आयात संपुष्टात आणण्याच्या तयारीत आहेत. सध्या देश-विदेशातील लहान-मोठ्या २०० पेक्षा जास्त कंपन्या आपली उत्पादने देशात विकत आहेत.

मोबाइल बाजारपेठेत ग्राहकांकडे अनेक पर्याय आहेत. विदेशी कंपन्यांमध्ये सॅमसंग, अ‍ॅपल, ब्लॅकबेरी, मायक्रोसॉफ्ट, एचटीसी आहेत. चिनी कंपन्यांमध्ये जियोनी, विवा आदी पर्याय आहेत. स्वदेशी कंपन्यांमध्ये मायाक्रोमॅक्स, लावा, इंटेक्स, कार्बन आणि स्पाइस मुख्य स्पर्धक कंपन्या आहेत. अनेक कंपन्या सध्या ऑनलाइन उत्पादने विकत आहेत. जियोनी ब्रँड विकणारी कंपनी सिनटेक टेक्नॉलॉजीचे सीईओ आणि एमडी अरविंद रजनीश वाेहरा म्हणाले, देशात दररोज १० हजार जियोनी स्मार्टफोन विकले जात आहेत. लोकांना ९० टक्के समस्या सॉफ्टवेअरशी संबंधित असतात. आम्ही ७२ तासांत हार्डवेअरच्या ८७ टक्के समस्या दूर करतो. मायक्रोमॅक्स इन्फर्मेटिक्सचे सहसंस्थापक राजेश अग्रवाल म्हणाले, आमची प्रति मोबाइल सरासरी विक्री किंमत १७००-१८०० रुपयांहून वाढून चार हजार झाली आहे.

एक वर्षानंतर बॅटरी खराब होणे आणि अँड्राॅइड रिस्पॉन्स टाइमच्या अडचणीबाबत अग्रवाल म्हणाले, स्वस्तातील हँडसेटच्या काहीशा मर्यादा असतात. मात्र, हायएंड फोनमध्ये तसे नसते. २० वर्षांपासून मल्टिब्रँड मोबाइल शॉप चालवणारे तेजिंदर सिंह म्हणाले, काही वर्षांपर्यंत मोबाइल चार वर्षांपर्यंत आरामशीर चालत होता. मात्र, आता १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल खरेदी केला, तरी सहा महिन्यांच्या आत हेडफोन, डाटा केबल आणि चार्जर बदलावे लागत आहे. दुसरीकडे स्मार्टफोनची बॅटरी बिघडण्याच्या आणि अँड्राइड फोन हँग होण्याच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. सध्या बाजारपेठेत कोणत्याही एका ब्रँडचा दबदबा नाही.

तंत्रज्ञानामुळे जीवनशैलीचा दर्जा बदलला आहे. कंपन्यांही ग्राहकांच्या आवडी लक्षात घेऊन संख्येपेक्षा बाजारमूल्यावर भर देत आहेत. २०१५ मध्ये १ लाख कोटी मोबाइलची विक्री होऊ शकते. - पंकज महेंद्रू, अध्यक्ष, इंडियन सेल्यूलर असोसिएशन
बातम्या आणखी आहेत...