मुकेश अंबानी यांनी गुरुवारी मुंबईमध्ये रिलायंसच्या 4G Jio या सेवेची घोषणा केली. जगातील सर्वात स्वस्त डाटा प्लान देण्याचा दावा त्यांनी केला आहे. या सेवेमध्ये व्हाईस कॉल फ्री असणार आहे. सण-उत्सवाच्या काळात SMS चार्ज लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले. या संग्रहात आम्ही आपल्या या सेवेच्या 10 सरप्राइजिंग ऑफर्स सांगत आहोत.
1. कोणत्याही नेटवर्कवर Voice Call पूर्णपणे मोफत.
2. केवळ 5 पैसे प्रती MB डाटा चार्ज, जगात सर्वात स्वस्त.
3. 2999 रुपयांमध्ये 4G Jio फोन मिळणार आहे.
4. केवळ 1999 रुपयात 4G Jio इंटरनेट रॉउटर
5. देशभरात रोमिंग पूर्णपणे फ्री राहणार आहे.
6. कोणत्याही सणाला SMS चा चार्ज लागणार नाही.
7. आधार नंबर वरून अवघ्या 15 मिनिटात एक्टिव्ह Jio कनेक्शन
8. रात्री अनलिमिटेड LTE डाटा
9. 300 Live टीव्ही चॅनल्स आणि 6 हजार मूव्हीज फ्री
10. पूर्ण देशभरात Reliance Jio चे 10 लाख WiFi झोन
रिलायंसच्या जियोसोबत डाटागीरी कशी?
- मुकेश अंबानी यांनी जाहीर केले की, Jio 4जी च्या सेवा सामान्यांसाठी 5 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत.
- लोकांनी डाटागीरी करावी असे त्यांना वाटते.
- अंबानी म्हणाने, "Jio 4 जी वर एक जीबी डाटाची किंमत 50 रुपये होती. आपण जेवढा डाटा खर्च करणार तेवढा दर कमी होत जाईल."
- ते म्हणाले की, इंटरनेट डाटाची ही किंमत जगात सर्वात कमी आहे.
- ते म्हणाले, शाळा-महाविद्यालयांमध्ये जियो वाय-फायची सेवा मोफत दिली जाईल.
- Jio 4 जीची सुरूवात करताना मुकेश अंबानी यांनी त्यांच्या टीमला लक्ष्य दिले की, कमीत कमी वेळात 10 कोटी ग्राहक बनवून विश्व विक्रम करा.
पुढील स्लाइड्सवर पाहा, जीओ 4 च्या सेवा..