आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधे सोपे उपाय केल्यास वाढेल तुमच्या Laptopची LIFE, चोरीपासून प्रोटेक्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव्या लॅपटॉपवर कंपनीतर्फे निश्चित काळासाठी वॉरंटी दिली जाते. वॉरंटी पिरियडमध्ये डिवाइस खराब झाल्यास कंपनीतर्फे विनामुल्य रिपेयर करून दिले जाते. मात्र, वॉरंटी संपल्यानंतर ग्राहकांना भूर्दंड बसत असतो. यासाठी आपल्या लॅपटॉपची काळजी घेणे आपल्यात हातात असते.

लॅपटॉपची काळजी कशी घ्यावी, या संदर्भात आम्ही आपल्याला सोप्या 10 टिप्स घेऊन आलो आहोत.

1. चोरीपासून प्रोटेक्शन:
थोडासा निष्काळजीपणा आपल्या लॅपटॉपचे मोठे नुकसान करू शकतो. अनेकदा प्रवासादरम्यान लॅपटॉप हरवतो. या प्रकरणात लॅपटॉप परत मिळण्याची शक्यता तशी कमीच असते. यासाठी लॅपटॉपच्या मागे, DVD ड्राइव्हवर, पॉवर कॉर्ड तसेच कीबोर्डवर पर्मानेंट मारकरने आपले नाव व कॉन्टॅक्ट नंबर लिहून ठेवावा.

यासोबतच आपल्या लॅपटॉप बॅगवर एक चांगल्या क्वॉलिटीचा लगेज टॅग देखील लावून ठेवावा. त्यावर आपली संपूर्ण माहिती लिहायला हवी. परिणामी लॅपटॉप हरवल्यास तो या माहितीच्या आधारे परत मिळवता येऊ शकतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, लॅपटॉपच्या प्रोटेक्शनशी संबंधित सोप्या टिप्स...