आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 11 Ways To Trick Android Into Using Less Intrenet Data

या 11 चुका कराल तर झटपट समाप्त होईल तुमचा Internet Data Pack!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीव्ही, कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि स्मार्टफोन या माहिती तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीमधील पायऱ्या ठरल्या आहेत. भारतात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र प्रचंड वेगाने विकसित होत आहे. त्या तुलनेत इंटरनेट युजर्सची संख्याही झपाट्याने वाढत आहे. स्मार्टफोनवर इंटरनेट वापरणे सहज शक्य झाल्याने जग खूप जवळ आले आहे.

फोनवर एखादी अॅप इन्स्टॉल करण्‍यापासून तर ईमेल चेक करण्यासाठी 'इंटरनेट' कनेक्शन आवश्यक असते. यासाठी अनेक यूजर्स अनलिमिटेड इंटरनेट डाटा पॅक वापरतात तर काही यूजर्स लिमिटेड डाटा पॅक खरेदी करतात. परंतु बहुतेक युजर्स मुदतीच्या आताच डाटा समाप्त झाल्याच्या तक्रारी करतात.

या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही आपल्याला यूजर्सच्या चुकांमुळे इंटरनेट डाटा पॅक झटपट समाप्त कसा होतो, या संदर्भात काही टीप्स घेऊन आलो आहोत.

अॅप्स ऑटो अपडेट:
यूजर्स आपल्या स्मार्टफोनवर आपल्या गरजेनुसार अॅप्स इन्स्टॉल करत असतो. यात अनेक अॅप्स ऑटो अपडेट होत असतात. दरम्यान, एखाद्या अॅप्सचे ऑटो अपडेट व्हर्जन आल्यानंतर आपल्या स्मार्टफोनवर ते ऑटो अपडेट होत असते. मात्र, यासंदर्भात युजर्सला माहिती नसते. परिणाम इंटरनेटचा डाटा पॅक झटपट समाप्त होतो. काही अॅप्स अशा असतात की त्यांचे अपडेट 30-40MB पेक्षाही जास्त असतात. अशा दोन-तीन अॅप्समध्येच 100MB पेक्षा जास्त डाटा खर्च करत असतात.

काय करावे:
सगळ्यात आधी 'गूगल प्ले स्टोअर्स'मधील सेटिंगमधील 'ऑटो अपडेट' बंद करावे. त्यानंतर तुमच्या स्मार्टफोनवर ऑटो अपडेट होणार नाही. त्यामुळे आपल्याला आवश्यक असलेल्या अॅप्स फक्त अपडेट कराव्या. अॅप्स अपडेट करण्यासाठी शक्यतो wi-fi नेटवर्कचा वापर करावा.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, इंटरनेट डाटा पॅक बचतीबाबत इतर टीप्स...