आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 12 Cell Phone Facts That Can Cause Serious Health Problems

टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरडा आहे आपला स्मार्टफोन, जाणून घ्या 12 Facts

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'स्मार्टफोन' हा आजच्या तरुणाईचा प्राणवायू ठरला आहे. परंतु या 'स्मार्टफोन'चा अतिवापर आरोग्यास धोकादायक ठरू शकतो. स्मार्टफोनमुळे आपल्याला मानसिक तसेच शारीरिक व्याधी देखील मागे लागू शकतात. बॅटरी चार्ज करताना फोनचा ब्लास्ट झाल्याच्या घटनांमध्ये अलिकडच्या काळात वाढ झाली आहे. त्यामुळे स्मार्टफोनसोबत केलेली घनिष्टता आपल्याला महागात पडू शकते, हे आपण लक्षात घ्यायला हवे.
आपला स्मार्टफोन टॉयलेट सीटपेक्षा किती घाणेरडा आहे, हे आम्ही आपल्याला या पॅकेजमधून सांगणार आहोत. पुढीलप्रमाणे वाचा 12 फॅक्टस...
1. टॉयलेट सीटपेक्षाही घाण आहे आपला स्मार्टफोन...
बदलती हवा, पाण्यामुळे सर्दी झाली, खोकला लागला आणि ताप आला, असे आपण सहज बोलून जातो. परंतु, आपला आवडत्या स्मार्टफोनमुळे तुमची तब्बेत बिघडली, असे आपल्याला कोणी सांगितले तर आपला त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र, हे खरे आहे. धुळीने माखलेला तुमचा स्माटफोन तुमचे आरोग्य खराब करु शकतो.

24 तासांपैकी किमात 16 ते 18 तास स्मार्टफोन आपल्याजवळच असतो. फोन दिवसभर आपल्यासोबतच असतो. आपण त्याला सारखा हाताळतो. कधी कानाजवळ तर कधी तोंडाजवळ नेतो. त्यावर तासंतास बोलतो. त्याचप्रमाणे दिवसभरात तो किती लोकांच्या हातात जाईल, याचा काही नेम नसतो. स्मार्टफोनला काही पाण्याने धुतले जात नाही. त्यामुळे स्मार्टफोनच्या माध्यमातून असंख्य बॅक्टेरिया आपल्या नाक-तोंडात जात असतात.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, स्मार्टफोन्सविषयी अन्य फॅक्ट...