आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

200 कोटींची बर्थडे पार्टी, एक लाखाचे विमान तिकिट, सहभागी झाले 300 सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व रिलायन्स उद्योग समुहाचे मालक मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नीता अंबानी या एक सोशल वर्कर व बिझनेसवुमन आहेत.

नीता अंबानी यांचा येत्या एक नोव्हेंबरला वाढदिवस आहे. सामाजिक कार्यक्रमात व बिझनेस पार्ट्‍यांवरून नेहमी चर्चेत रा‍हाणार्‍या नीता अंबानी यांचा 50 वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्‍यात आला होता. जोधपूरमध्ये वाढदिवसाची शानदार पार्टी देण्यात आली होती. या पार्टीसाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च करण्‍यात आले होते. यात उद्योग जगतामधील नामी हस्तीसह बॉलीवूडमधील 300 सेलेब्स सहभागी झाले होते.

शाही पार्टीत मुकेश अंबानी यांच्या मातोश्री कोकिला बेन, भाऊ अनिल अंबानी यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सहभागी झाले होते. याशियाय अनिल कपूर, अमिर खान, रणबीर कपूर, सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, उद्धव ठाकरे, करिश्मा कपूर, गीता बसरा, विनोद खन्ना, कविता खन्ना, अभिषेक कपूर, अनु मलिक,शेखर कपूर, राज कुमार हिराणी, राकेश ओम प्रकाश मेहरा,राहुल बोस यांच्यासह शेकडो सेलिब्रिटी सहभागी झाले होते.

बालसमंद तळ्यात बनवण्यात आलेल्या भव्य कमळाच्या फूलात कापला होता केक
बालसमंद तळ्यात बनवण्यात आलेल्या भव्यदीव्य कमळाच्या फुलात बसून बर्थडे वुमन नीता अंबानी यांनी केक कापला होता. तळ्याच्या काठी असलेले उम्मेद भवन विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते. पाहुण्याना कार्यक्रमस्थळापर्यंत ने-आण करण्‍यासाठी 32 चार्टर्ड विमाने सज्ज ठेवण्यात आले होते.

200 कोटी रुपये खर्च...
नीता अंबानी यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त जोधपूर येथे आयोजित करण्‍यात आलेल्या पार्टीसाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च करण्‍यात आले होते. मुकेश अंबानी यांनी पत्नीला एक एअर बस विमान गिफ्ट केले होते.
एक लाखात विकले गेले फ्लाइट तिकिट
नीता अंबानी यांच्या 50 व्या वाढदिवसाला येणार्‍या पाहुण्यांची संख्या इतकी होती की, सर्व फ्लाइट्स फुल होत्या. जेट एअरवेजने मुंबई-जोधपूर थेट विमानसेवा सुरु केली होती. या विमानाचे तिकिट एक लाख रुपयांत विकले गेले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, नीता अंबानी यांच्या बर्थडे पार्टीला आलेल्या पाहुण्याचे फोटोज...