आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Apple साठी iPhone 6s ठरला UNLUCKY? मार्केट व्हॅल्युमध्ये घट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हीडिओ पाहाण्यासाठी वरील फोटोवर क्लिक करा...

सॅन फ्रांसिस्को- Apple ने बुधवारी आपले बहुचर्चित iPhone 6s व 6S Plus स्मार्टफोन लॉन्च केले. याशिवाय सगळ्या मोठा स्क्रीन असलेला (12.9 इंच) iPad Pro, Apple TV, Apple Watch व iOS 9 देखील कंपनीने सादर केले आहेत. मात्र, हा लॉन्चिंग कंपनीसाठी इव्हेंट 'अनलकी' ठरला आहे. इव्हेंट सुरु असतानाच Apple चे मार्केट व्हॅल्युत सुमारे एक लाख कोटी रुपयांची घट दिसून आली आहे.

संपूर्ण इव्हेंटमध्ये कंपनीचा फोकस Apple TV व iPad Proवरच होता. या प्रॉडक्ट्समध्ये अपग्रेडेशनच्या ऐवजी इनोव्हेशन दिसले.

एका बाजुला लॉन्चिंग इव्हेंट सुरु असताना दुसरी बाजूला कंपनीचे शेअमात्र, यूएसच्या नॅसडेक स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनीच्या शेअर्स मोठ्याप्रमाणात घसरले. यामुळे Appleच्या मार्केट व्हॅल्युमध्ये सुमारे एक लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. ही रक्कम 50 छोट्या देशाच्या जीडीपी बरोबर समजली जात आहे.

अशी झाली घसरण...
न्यूयॉर्कमध्ये स्थानिक वेळेनुसार बुधवारी दुपारी एक वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री 10:30) लॉन्चिंग इव्हेंट सुरु झाला तेव्हा कंपनीचे मार्केट व्हॅल्यू 41.47 लाख कोटी रुपये होते. iPad pro ची घोषणा होतात कंपनीचे मार्केट व्हॅल्यु 42 लाख कोटींवर पोहोचले. मात्र, कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी iPhone 6S व 6S Plus लॉन्च करताच कंपनीचे मार्केट व्हॅल्यु 40.97 लाख कोटींवर घसरले. कंपनीचे 1.03 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बाजार बंद झाला तेव्हा कंपनीचा स्टॉक जवळपास 2 टक्क्यांनी घसरुन 62815 कोटी डॉलरच्या मार्केट व्हॅल्यूवर बंद झाला.

नॅसडेक स्टॉक एक्सचेंजमध्ये Applle
दुपारी एक वाजता लॉन्चिंग इव्हेंट सुरु झाला
iPad Pro च्या लॉन्चिंगनंतर काही मिनिटांत म्हणजेच 1:20 PM वाजता
Apple Pencil व TV ची घोषणा होताच (1:25 PM)
iPhone 6S y 6S Plus लॉन्च होताच (2:40 PM)
स्टॉक प्राइस
112.70 डॉलर
114.02 डॉलर
113.40
111.40
मार्केट व्हॅल्यु
63800 कोटी डॉलर (41.47 लाख कोटी रुपये)
64600 कोटी डॉलर (42 लाख कोटी रुपये)
64200 कोटी डॉलर (41.73 लाख कोटी रुपये)
63043 कोटी डॉलर (40.97 लाख कोटी रुपये)

Apple कडून होत्या या अपेक्षा..
1. Apple कार
2. स्वस्त iPhone
3. ऑप्टिकल इमेज स्टेबलायझेशन

iPad-Pro व Apple TV वरच जास्त फोकस
काही वर्षांपासून कंपनीच्या लॉन्चिंग प्रोग्राममध्ये iPhone चाच जास्त बोलबाला असायचा. मात्र, या इव्हेंटमध्ये कंपनीने iPad- Pro व Apple TV वर जास्त फोकस करण्यात आला. दोन्ही डिव्हाइस खास पद्धतीने सादर करण्‍यात आले.

iPhone 6S व 6S Plus आधीच्या व्हर्जनच्या तुलनेत शानदार आहेत तर Apple TV ला मागील तीन वर्षांत पहिल्याला अपडेट करण्‍यात आले आहे. या टीव्हीच्या माध्यमातून स्ट्रीमिंग टीव्ही बॉक्सच्या मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण करण्‍याचा कंपनीचा इदारा आहे. या मार्केटमध्ये आधीच गूगल, अमेझन सारख्या कंपन्यांनी आपल्या जम बसवला आहे. मात्र, आतापर्यंतचा सर्वात मोठ्या साइजमधील iPad -Pro कंपनीच्या टॅबलेट बिझनेस नवसंजीवनी देईल, अशी अपेक्षा आहे. मागील काही महिन्यांपासून कंपनीच्या iPad च्या विक्रीत कमालीची घट दिसून आली आहे. यामुळेच कंपनी यावेळी इनोव्हेशनच्या बाबतीत दोन प्रॉडक्ट्‍सवरच जास्त फोकस केलेला दिसत आहे.

iPhone 6S व 6S Plus यंदा एकूण 130 देशांमध्ये लॉन्च करण्‍यात येणार आहे. भारतात हा फोन कधी उपलब्ध होईल, त्यांच्या किमती काय असतील, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

iPhone 6S चा डिस्प्ले 4.7 इंचाचा आहे. तर 6S Plus चा डिस्प्ले 5.5 इंचाचा आहे. कंपनीने आतापर्यंत लॉन्च केलेल्या फोनमध्ये हे फोन जास्त फास्ट आहे. 6S व 6S Plue सिल्व्हर, गोल्ड, स्पेस ग्रे आणि रोज गोल्ड कलरमध्ये उपलब्ध करून देण्यात येतील. दोन्ही फोनमध्ये अत्याधुनिक 'टच' टेक्नॉलॉजीसह शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही हँडसेट 3D टच टेक्नॉलॉजीने अद्ययावत आहेत.
US यूजर्ससाठी दोन्ही व्हेरिएंटची किंमत दोन वर्षांच्या कॉन्ट्रॅक्टवर खालीलप्रमाणे राहातील...
iPhone 6S किंमत
16GB 199 डॉलर (जवळपास 13,244 रुपये)
64GB 299 डॉलर (जवळपास 19,899 रुपये)
128GB 399 डॉलर (जवळपास 26,555 रुपये)
iPhone 6S Plus किंतम
16GB 299 डॉलर (जवळपास 19,899 रुपये)
64GB 399 डॉलर (जवळपास 26,555 रुपये)
128GB 499 डॉलर (जवळपास 33,210 रुपये)

पुढील स्लाइडवर पाहा, सॅन फ्रान्सिस्कोमधील मेगा इव्हेंटमध्ये Apple ने सादर केलेले डिव्हाइसेस...