नवी दिल्ली- काही माणसे अशी असतात की, ब्रॅंडशिवाय बोलतच नाही. महागड्या वस्तू खरेदी करण्याचा जणू त्यांचा छंदच जडला असतो. माहितीचे मायाजाल अर्थात इंटरनेटने संपूर्ण विश्व व्यापले असताना लॅपटॉपच्या मागणीत झपाट्याने वाढ झाली आहे. काही धनाढ्य लोक इतके महागडे लॅपटॉप वापरतात की, एका लॅपटॉपच्या किमतीत एक
फेरारी कार खरेदी केली जाऊ शकते.
आम्ही या पॅकेजमधून
आपल्याला जगातील सर्वात पाच महागड्या लॅपटॉपविषयी माहिती देत आहोत. सर्वात महागड्या लॅपटॉपची किंमत जवळपास पाच कोटी रुपये आहे.
लव्हेग्लियो
किंमतः 4 कोटी 90 लाख रुपये (10 लाख डॉलर)
'लव्हेग्लियो' हा लॅपटॉप रिच लोकांसाठी ऑर्डरनुसार तयार केला जातो. उल्लेखनिय म्हणजे लॅपटॉपची डिझाइन आणि मटेरियल ग्राहकांच्या पसंतीनुसार बसवलेले जाते. यात 128 GB ची हार्ड डिस्क, एमपी थ्री प्लेयर आणि अन्य लॅपटॉपसारख्या सुविधा मिळतात.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, अन्य महागड्या लॅपटॉपविषयी...