आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 इंच स्क्रीन असलेले हे 10 अँड्रॉईड स्मार्टफोन, किंमत 10 रुपयांपेक्षा कमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क: स्मार्टफोन वापरणाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे फोन आवडतात. यातील काही युजर्स हेवी प्रोसेसर आणि रॅम पाहातात, तर काही युजर्स कॅमेरा, फोकस फ्रन्ट कॅमेरा इत्यादींच्या बाबतीत विचार करतात, तर काही युजर्सला मोठ्या स्क्रीनचे स्मार्टफोन आवडतात. Divyamarathi.com आज तुम्हाला भारतीय बाजारपेठेतील 10 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या 6 इंचाच्या स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहे.
स्क्रीन आणि किंमत
पॅनासॉनिक P61 ला 6 इंच स्क्रीन आहे. या स्मार्टफोनला ऑनलाईन शॉपिंग साईटवरून विकत घेता येऊ शकते. या फोनची किंमत 9,500 रुपये एवढी आहे.
फीचर्स :
हा एक मेटबॉडी फॅबलेट आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हा फोन मेटल बॅक कव्हर फीचरसोबत मिळतो. या फोनमध्ये एक नवीन फीचर ग्लाईड प्लेसुध्दा देण्यात आले आहे. हे फीचर अॅप्सला विंडोजमोडमध्ये खेळण्याची सुविधा देते. अशावेळी एक अॅप वापरताना दुसऱ्या अॅपवर जाणे सोपे जाते. 6 इंच स्क्रीन असलेल्या या फोनमध्ये HD डिस्प्ले (1280 x 720 पिक्सल) रेझोल्यूशन स्क्रीन क्वालिटी मिळते. तर यामध्ये 1.3 GHz च्या क्वाड-कोर प्रोसेसरसोबत 1 GB रॅम आणि 16 GB इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. यासोबतच या फोनची मेमरी 32 GB पर्यंत वाढवता येऊ शकते. या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा रेअर कॅमेरा विथ फ्लॅशची सुविधा देण्यात आली असून सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 2 मेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला आहे.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, 10 हजारांपेक्षा कमी किंमतीचे 6 इंच स्क्रीन असणाऱ्या इतर स्मार्टफोन्सबद्दल