Home | Business | Gadget | Steps: How To Fix Water Damaged Or Wet Smartphone

पावसात फोन भिजला, तर वेळ न घालवता फॉलो करा या 7 STEP

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 22, 2018, 05:31 PM IST

पावसाळ्यात फोन भिजण्याची भीती प्रत्येकालाच असते. फोनच्या आत पाणी गेल्यावर इलेक्ट्रॉनिक पार्ट्स खराब होण्याची शक्यता असत

 • Steps: How To Fix Water Damaged Or Wet Smartphone

  गॅझेट डेस्क- पावसाळ्यात फोन भिजण्याची भीती प्रत्येकालाच असते. फोनच्या आत पाणी गेल्यावर इलेक्ट्रॉनिक पार्ट्स खराब होण्याची शक्यता असते. तुम्हाला माहित आहे का फोन पाण्यात भिजल्यावर किंवा पाण्यात पडल्यावर त्याला ड्राय कसा करता येईल.

  आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत.

  #फोन पाण्यात पडल्यावर किंवा भिजल्यावर या चुका करु नका
  1) फोन पाण्यात पडल्यावर ड्रायरने पाणी काढाण्याचा प्रयत्न करु नका, कारण ड्रायर खूप जास्त गरम हवा फेकतो, त्यामुळे आतील पार्ट्स खराब होण्याची शक्यता जास्त असते.
  2) जर फोन पाण्यात भिजला आहे तर त्यावेळी ताबडतोब स्वीच ऑफ करा, दुस-या कोणत्याही बटनचा वापर करु नका. त्यामुळे शॉर्टसर्किटचा धोका होऊ शकतो.
  3) जोपर्यंत फोन पुर्णपणे सुखवला जात नाही तोपर्यंत हेडफोन किंवा फोनच्या युएसबी पार्टचा वापर करु नका. जेणेकरुन फोनमधील कोणत्याही पार्ट्स धोका होणार नाही.


  # एक्सपर्टचा सल्ला
  भोपाळचे मोबाईल रिपेयरिंग एक्सपर्ट प्रशांत दिलारे यांच्यानुसार, फोनमधील पाणी बाहेर काढण्यासाठी कधी ड्रायर किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर करु नका. जेणेकरुन तुमचा फोन खराब होणार नाही. सिलिका जेलचे पॉकेट किंवा एका प्लेटमध्ये तांदुळ घेऊन त्यामध्ये मोबाईल सुखवला जाऊ शकतो.

  # या स्टेप्सला करा फॉलो

  STEP : 1

  फोन पाण्यात भिजल्यानंतर सर्वातआधी स्वीच ऑफ करा, जर फोन ऑन असेल तर आतील पार्ट्समध्ये पाणी जाऊन शॉट सर्किट होऊ शकते. फोनमध्ये पाणी गेले आहे की नाही चेक करण्याचा प्रयत्न करुन नका. त्यावेळी सर्वात आधी मोबाईल स्वीच ऑफ केल्यानेच फायदा होईल.

  पुढेच्या स्लाइडवर वाचा फोन सुखवण्याच्या अन्य काही टीप्स...

 • Steps: How To Fix Water Damaged Or Wet Smartphone

  STEP- 2

  भिजलेल्या फोन आधी स्वीच ऑफ करुन सर्व पार्ट्स वेगवेगळे करा. जसे की बॅटरी, सिमकार्ड, मेमरी कार्ड सोबतच फोनला अॅट्ज असलेले पार्ट्स बाजुला काढून टॉवेलवर ठेवावेत. या सर्व पार्ट्स काढल्यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका होणार नाही.

   

 • Steps: How To Fix Water Damaged Or Wet Smartphone

  STEP- 3
  जर तुमच्या फोनची बॅटरी इनबिल्ट असेल तर बॅटरी काढण्याचा प्रश्नच येत नाही, त्यावेळी तुम्ही फक्त जोपर्यंत मोबईल स्वीच ऑफ होत नाही तोपर्यंत पॉवर बटन दाबून ठेवा. इनबेल्ट बॅटरीमुळे शॉर्ट सर्किट होऊ शकते.

   

 • Steps: How To Fix Water Damaged Or Wet Smartphone

  STEP- 4
  फोनचे सर्व पार्ट्स वेगवेगळे केल्यानंतर त्यांना सुखावणे महत्वाचे आहे. यासाठी पेपर नॅपकिन वापर करणे अधिक फायदेशीर राहिल. यासोबतच फोन साफ करण्यासठी नरम कपड्याचा वापरही केला जाऊ शकतो.

   

 • Steps: How To Fix Water Damaged Or Wet Smartphone

  STEP : 5
  नरम कपड्याने फोन साफ केल्यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे फोनमधील इंटरनल पार्ट्स सुखू द्या. त्यासाठी तुम्ही एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्याठिकाणी इतर पार्ट्स आणि मोबाईल तांदळाच्या प्लेटमध्ये ठेवून सुखाऊ शकता. तांदूळ मोबाईलमधून पाणी शोषून घेते आणि फोन पुर्णपणे सुखावला जाईल.

   

 • Steps: How To Fix Water Damaged Or Wet Smartphone

  STEP : 6
  जर तुम्हाला तांदळाच्या प्लेटमध्ये फोन सुखावयाचा नसेल तर तुम्ही सिलिका जेल  (silica gel pack) चा वापर करु शकता. हे जेल पॅकेट बुटांच्या डब्यात ठेवलेले असते. यामध्ये तांदळापेक्षा जास्त पटीने पाणी शोषून घेण्यात ताकत असते.

 • Steps: How To Fix Water Damaged Or Wet Smartphone

  STEP : 7
  आपल्या फोनला कमीत कमी 24 घंटे सिलिका जेल पॅकेट किंवा तांदळाच्या प्लेट ठेवा. जोपर्यंत पुर्णपणे फोन सुखावला जात नाही तोपर्यंत स्वीच ऑन करण्याचा विचार करु नका. फोन बरोबरच इतर पार्ट्सही तांदळाच्या प्लेटमध्ये दाबून ठेवू शकता, त्यामुळे सर्व पार्ट्स पुर्णपणे सुखावले जातील. जोपर्यंत फोन पुर्णपणे सुखावला जात नाही तोपर्यंत स्वीच ऑन करु नका.

   

  (नोट-या सर्व टीप्स वापरल्यानंतरही फोन ऑन होत नसेल किंवा प्रॉब्लेम येत असेल तर मग सर्व्हिस सेंटरला दाखवा.)

Trending