आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - स्वस्त दरात इंटरनेट आणि कॉलिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या रिलायन्सने जिओ यूजर्ससाठी डाटा प्लॅन आणला आहे. कंपनीकडे आतापर्यंत 20 प्लॅन आहेत. मात्र हा प्लॅन वेगवेगळ्या कॅटिगरीमध्ये दिला जात आहे. यातील एक कॅटिगरी फक्त जिओ फोनसाठी आहे. आता कंपनी एक नवा प्लॅन घेऊन आली आहे. या प्लॅनमध्ये वर्षभरासाठी 1024GB 4G डाटा दिला जाणार आहे. हा इंडियातील सर्वात मोठा डाटा प्लॅनदेखील आहे. मात्र या प्लॅनचा फायदा फक्त निवडक यूजर्सला मिळणार आहे.
या यूजर्सला मिळणार फायदा
- रिलायन्स जिओने भारतातील सर्वात मोठा डाटा प्लॅन आणला आहे तो फक्त सॅमसंग गॅलेक्सी S9+ आणि S9 स्मार्टफोन खरेदीवरच मिळणार आहे. जे यूजर्स हे स्मार्टफोन रिलायन्स जिओच्या ऑफिशियल वेबसाइटवरुन खरेदी करतील त्यांनाच या ऑफरचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी त्यांना 4999 रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे.
- या प्लॅनमध्ये 1TB सोबत अनलिमिटेड डाटा मिळणार आहे. सोबतच कॉलिंग, रोमिंग, एसएमएस यासर्व सर्व्हिसेज पूर्णपणे मोफत मिळणार आहेत. जर एक वर्षाच्या आत तुमचा 1026GB 4G डाटा संपला तर 2G स्पीड मिळणार आहे. या रिचार्जवर 1500 रुपयांचा अतिरिक्त फायदाही मिळणार आहे. ़
जिओचा सर्वात मोठा डाटा प्लॅन
- हा रिलायन्स जिओचा सर्वात मोठा डाटा प्लॅन आहे. कंपनीकडे याशिवायही अनेक डाटा प्लॅन आहेत.
- कंपनीचा नियमीत 4999 रुपयांचा प्लॅनमध्ये 350GB डाटा मिळतो. तर सॅमसंग फोनसोबत त्याच किंमतीत 650GB डाटा मिळतो. दुसरीकडे, कंपनीचा सर्वात महागडा डाटा प्लॅन 9999 रुपयांचा आहे. यामध्ये 750GB डाटा मिळतो. एकूणच सॅमसंग फोनसोबत कंपनी कमी किंमतीत भरपूर डाटा देत आहे.
पुढील स्लाइडवर जाणून घ्या सर्व डाटा प्लॅनबद्दल...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.