Home | Business | Gadget | Twitter New Policy Will Set The Limit For Tweet Like Follow And Messages

ट्विटर पॉलिसी बदलणार: 3 तासांत 300 फक्त ट्वीट करता येणार, री-ट्वीट-फॉलो करण्याचीही मर्यादा ठरणार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 26, 2018, 04:34 PM IST

ट्विटरने त्यांच्या या नव्या पॉलिसीबाबत ब्लॉग पोस्टमध्ये माहिती दिली आहे. फेक न्यूज आणि खोट्या पोस्टला रोखण्यासाठी हे पाऊ

 • Twitter New Policy Will Set The Limit For Tweet Like Follow And Messages

  - नव्या पॉलिसीमुळे सामान्य लोकांना फार नुकसान होणार नाही

  - फेक न्यूजचा रोखण्यासाठी बदल करण्यात आल्याचा अंदाज वर्तवला जातोय

  गॅझेट डेस्क - मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्वीटर लवकरच पॉलिसी बदलणार आहे. तसे झाल्यानंतर ट्वीट-री-ट्वीट करण्याची आणि लाइक-फॉलो करण्याची एक मर्यादा घालून दिली जाईल. ही नवी पॉलिसी 10 सप्टेंबरपासून लागू करण्यात येईल. ट्विटरने त्यांच्या या नव्या पॉलिसीबाबत ब्लॉग पोस्टमध्ये माहिती दिली आहे. फेक न्यूज आणि खोट्या पोस्टला रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.


  चार बदल होणार
  1) यूझर तीन तासांत फक्त 300 ट्वीट-री-ट्वीट करू शकतील.
  2) 24 तासांत फक्त 1000 ट्वीट लाइक करता येतील.
  3) 24 तासांत 1000 पेक्षा जास्त लोकांना फॉलो करता येणार नाही.
  4) 24 तासांत फक्त 1500 लोकांनाच मॅसेज पाठवता येतील.

  लाखों फॉलोअर्स असणाऱ्यांचे नुकसान
  यामुळे सामान्य लोकांना फार काही फरक पडणार नाही. या नव्या पॉलिसीचा सर्वाधिक फटका अशा सेलिब्रिटींना बसणार आहे, ज्यांचे फॉलोअर्स रोज वाढतात. तसेच सेलिब्रिटीजचे ट्वीटही जास्त रिट्वीट होणार नाहीत.

  तीन महिन्यांत डिलिट केले 1.43 लाख अॅप्स
  ट्विटरने यावर्षी एप्रिल ते जूनदरम्यान त्यांच्या प्लॅटफॉर्महून 1 लाख 43 हजारहून जास्त अॅप डिलिट केले. त्यांचे म्हणणे आहे की, हे अॅप पॉलिसीचे उल्लंघन करत होते. त्यांच्यामुळे प्लॅटफॉर्मवर स्पॅम (विनाकारणचे मॅसेज) येत होते. असे अॅप कमी करण्यासाठी कंपनीने 'रिपोर्ट अ बॅड अॅप'चा पर्यायही सुरू केला आहे. त्याद्वारे अशा अॅपबाबत कंपनीला माहिती देऊ शकतात.

 • Twitter New Policy Will Set The Limit For Tweet Like Follow And Messages
 • Twitter New Policy Will Set The Limit For Tweet Like Follow And Messages

Trending