Home | Business | Gadget | How To Enable Guest Mode On Android Smartphone

फक्त ON करा ही एक सेटिंग, लॉक न करताही सुरक्षीत होईल तुमचा फोन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 30, 2018, 12:59 PM IST

जवळपास सर्वच लोक आपल्या फोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा डेटा सेव्ह ठेवतात. यामध्ये फोटो, व्हिडिओसोबतच बॅंकेचे काही महत्त्वा

 • How To Enable Guest Mode On Android Smartphone

  युटिलिटी डेस्क - जवळपास सर्वच लोक आपल्या फोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा डेटा सेव्ह ठेवतात. यामध्ये फोटो, व्हिडिओसोबतच बॅंकेचे काही महत्त्वाचे अॅप्सही असतात. जे ओपन करुन त्याचा कोणीही चुकिचा उपयोग करू शकतो. अशामध्ये आवश्यक आहे की, पुर्णपणे फोन सुरक्षीत असावा. आज तुम्हाला अशा सेटिंगबद्दल सांगणार आहोत. जी ऑन केल्यानंतर तुमच्या फोनचा कोणीही चुकीचा वापर करु शकत नाही.

  स्पेशल प्लॅटफॉर्मवर राहणार सुरक्षीत
  सर्व जण फोनमध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅपसारखे सोशल अॅप वापरतात. यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रोटेक्शन नसते. म्हणजे तुमच्या प्रायव्हसीला धोका असतो. पण फोनच्या या सेटिंगला ON केल्याने तुमचा फोन पुर्ण सुरक्षीत होईल.

  कोणतेही अॅप इन्स्टॉल करावे लागणार नाही..
  या सेटिंगसाठी तुम्हाला फोनमध्ये कोणते थर्ड पार्टी अॅप इन्स्टॉल कराण्याची आवश्यकता नाही. हे फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन ऑन करु शकतात. याचा मोठा फायदा म्हणजे फोनमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर सर्व अॅप्स हाईड होईल. सोबतच फोनमधील फोटो, व्हिडिओ आणि कॉन्टॅक्टही दिसत नाही. म्हणजे फोनचे सॉफ्टवेअर पुर्णपणे नवे होईल.

  पुढील स्लाइडवर जाणून घ्या कशी ऑन करतात ही सेटिंग...

 • How To Enable Guest Mode On Android Smartphone

  सर्वात पहिले स्मार्टफोनच्या Settings मध्ये जा. तेथे Device मध्ये Users चे ऑप्शन येते. त्यावर टॅब करा. तुमच्या समोर युजरची विंडो येईल. ज्यामध्ये तुमच्या नावासोबत Guest असते. सोबतच येथे Add user चे ऑप्शनही असते.

   

 • How To Enable Guest Mode On Android Smartphone

  आता Add User वर टॅब करा. असे केल्याने नवीन यूजरला अॅड करण्याचा मॅसेज येईल. त्याला OK करा. आता User सेटिंगचा मॅसेज येईल. येथे SET UP NOW वर टॅब करा. नंतर मॅसेजला फॉलो करत जा.

   

 • How To Enable Guest Mode On Android Smartphone

  आता Users च्या लिस्टमध्ये नवीन यूजर अॅड होईल. या यूजरसाठी तुमच्या फोनची सेटिंग पुर्ण नवीन होईल. म्हणजे फोनचा कोणताच डेटा दिसणार नाही. फक्त अॅन्ड्रॉइडचे डिफॉल्ट अॅप्स दिलेल.

Trending