Home | Business | Gadget | Malware Virus Can Do Your Bank Accounts Empty Alert

सावधान: हा व्हायरस तुमच्या स्मार्टफोनध्ये असेल तर होईल बँक खाते रिकामे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 24, 2018, 12:00 AM IST

आजघडीला डिजीटलचे वारे जोरात वाहू लागले आहे. जो तो बँक अथवा खासगी कंपन्यांच्या अॅपचा वापर करून स्मार्टफोनवरून पेमेंट करण्

 • Malware Virus Can Do Your Bank Accounts Empty Alert

  बिझनेस डेस्क - आजघडीला डिजीटलचे वारे जोरात वाहू लागले आहे. जो तो बँक अथवा खासगी कंपन्यांच्या अॅपचा वापर करून स्मार्टफोनवरून पेमेंट करण्याला प्राधान्य देतोय. त्यामुळे बरीच कामे सुकर झाली आहेत. मात्र, असे असले तरीही ट्रोजन नावाच्या एका व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातलाय. हा व्हायरस फक्त तुमचा मोबाईल नव्हे, तर तुमच्या बँकेच्या डिटेल्सही हॅक करतो. त्यानंतर लगोलग तुमचे खाते रिकामे करण्यास सुरवात होते.


  पुढील स्लाईडवर वाचा - जगभरात असा धुमाकूळ घालतोय हा व्हायरस...

 • Malware Virus Can Do Your Bank Accounts Empty Alert

  जॅफकॉपी ट्रोजन नावाच्या एका व्हायरसने आतापर्यंत 40 टक्के भारतीयांचे नुकसान केल्याचा अंदाज आहे. भारतासह जगभरात या व्हायरसची दहशत वाढलेली आहे.

 • Malware Virus Can Do Your Bank Accounts Empty Alert

   जगभरात 47 देशांमध्ये स्मार्टफोनवर हल्ला करून बँक डिटेल्स चोरी करतो. तुमच्या मोबाईलमध्ये या व्हायरसाचा शिरकाव झाला. तरीही तुम्ही त्याबाबत अनभिज्ञ असतात. कारण, तुमचा फोन नेहमीप्रमाणेच काम करतो.
  वायरलेस अॅप्लिकेशन प्लॅटफॉर्मद्वारे हा व्हायरस तुमच्या मोबाईलमध्ये शिरकाव करतो. वॅप ही एक मोबाईल पेमेंट सिस्टीम आहे. याद्वारे तुमचा खर्च थेट मोबाईल बिलात जोडला जातो. याचा थांगपत्ताही ग्राहकांना न लागू देता पेमेंटही केले जाते. डेबिट आणि क्रेडिट कार्डचे सबस्क्रिप्शन घेऊन पैसे उडण्याचाही धोका आहे

 • Malware Virus Can Do Your Bank Accounts Empty Alert

  हा व्हायरस कॅप्चा कोडलाही भेदून पुढे सरकतो. त्यामुळे या व्हायरसपासून बचावण्यासाठी कोणतेही थर्ड पार्टी अॅप डाऊनलोड करू नका. त्याचबरोबर मोबाईलमध्ये अँटीव्हायरस आणि अन्य सेक्युरिटी मॅसेजेसवर लक्ष द्या. 

Trending