Home | Business | Gadget | Overheating In Smartphone :4 Causes

गरम होत आहे तुमचा स्‍मार्टफोन, असू शकते हे कारण; जाणून घ्या उपाय

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 22, 2018, 10:21 AM IST

अनेकांचा स्‍मार्टफोन लवकर गरम होऊन जातो. यामुळे मोबाईल नीट फंक्‍शनही होत नाही आणि कॉलिंगही मध्‍येच कट होऊन जाते. अनेकां

 • Overheating In Smartphone :4 Causes

  गॅजेट डेस्‍क- अनेकांचा स्‍मार्टफोन लवकर गरम होऊन जातो. यामुळे मोबाईल नीट फंक्‍शनही होत नाही आणि कॉलिंगही मध्‍येच कट होऊन जाते. अनेकांना याचा त्रास सहन करावा लागतो. मात्र असे का होते? याबाबत अनेकांना माहिती नसते. आज आम्‍ही तुम्‍हाला मोबाईल गरम होण्‍याची 4 प्रमुख कारणे सांगणार आाहेत, ज्‍यामुळे तुम्‍ही आपला मोबाईल गरम होण्‍यापासून वाचवू शकाल.

  प्रोसेसर
  मोबाईल गरम होण्‍यामागे सर्वात महत्‍त्‍वाची भूमिका असते ती प्रोसेसरची. स्‍नॅपड्रॅगन 810 आणि 615 या प्रोससरमध्‍येहिटींगची समस्‍या येते. जर तुमच्‍या मोबाईलमध्‍ये यापैकी एखादे प्रोसेसर असेल तर तुमचा मोबाईल गरम होईल. मोबाईल खरेदी करतानाच या गोष्‍टीची काळजी घेतल्‍यास तुम्‍हाला ही समस्‍या जाणवणार नाही.


  पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, स्‍मार्टफोन गरम होण्‍याची इतर कारणे...

 • Overheating In Smartphone :4 Causes

  बॅटरी
  Li- ion बॅटरीमुळे ही फोन गरम होतो. या बॅटरीजमुळे थर्मल रनवे होते. ज्‍यामुळे पूर्ण मोबाईलमध्‍ये उष्‍णता निर्माण होते. विशेषकरुन स्‍मार्टफोनची बॉडी मेटलची असेल तर ही समस्‍या जास्‍त जाणवते.

 • Overheating In Smartphone :4 Causes

  कमकुवत सिग्‍नल 
  तुम्‍हाला आश्‍चर्य वाटेल पण नेटवर्क खराब असेल किंवा Wi-Fi सिग्‍नल कमकुवत असेल तर अॅप इन्‍स्‍टॉल करतानाही स्‍मार्टफोन गरम होतो. कारण अशा वेळी अॅप इन्‍स्‍टॉल करण्‍यासाठी स्‍मार्टफोनला जास्‍त एनर्जी लागते.

 • Overheating In Smartphone :4 Causes
  जास्‍त वापर करणे
  शेवटचे कारण आहे फोनचा जास्‍त वापर करणे. जर तुम्‍ही दिवसभर मोबाईलवर हाय क्‍वॉलिटी गेम खेळत असला किंवा व्हिडिओ पाहात असाल तर मोबाईल गरम होतो. 

  पुढील स्‍लाइडवर वाचा, यावरील उपाय... 
 • Overheating In Smartphone :4 Causes

  हे आहेत उपाय 
  - मोबाईल ओव्‍हरहिटिंगपासून वाचण्‍यासाठी हाय ग्राफीक्‍सचे गेम जास्‍त वेळ खेळू नका. 
  - एकाच वेळेस जास्‍त अॅपवर काम करु नका. कारण यासाठी जास्‍त प्रोसेसिंग पॉवर खर्च होते. 
  - मोबाईलची बॅटरी खराब असेल तर मोबाईल हिटिंगची समस्‍या वारंवार जाणवेल. यामुळे नवीन बॅटरी खरेदी करा. 

Trending