Home | Business | Gadget | This Way Wireless Charger Works

असे काम करते वायरलेस चार्जर, असे आहे हे तंत्रज्ञान

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 23, 2018, 07:26 PM IST

आयफोन 8, आयफोन 8 प्लस, आयफोन एक्स, सॅमसंग गॅलॅक्सी एस-8, गॅलॅक्सी एस-7 आणि नोट 8 या स्मार्टफोनमध्ये वायरलेस चार्जिंगची स

 • This Way Wireless Charger Works

  नवी दिल्ली -आयफोन 8, आयफोन 8 प्लस, आयफोन एक्स, सॅमसंग गॅलॅक्सी एस-8, गॅलॅक्सी एस-7 आणि नोट 8 या स्मार्टफोनमध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधा देण्यात आली. या कंपन्यांनी वायरलेस चार्जिंगची संकल्पना प्रत्यक्षात आणल्यानंतर अनेकांच्या मनात मोबाईल चार्जिंग कसा होत असेल? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असतील. जाणून घेऊया वायरलेस चार्जरच्या कामाची पद्धत.


  पुढील स्लाईडवर वाचा - वायरलेस चार्जिंगमध्ये हे असते तंत्रज्ञान...

 • This Way Wireless Charger Works

  वायरलेस चार्जिंगमध्ये हे असते तंत्रज्ञान
   
  खरे पाहता वायरलेस चार्जिंग वायरलेस नसते. विशेष म्हणजे स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि वायरलेस हेडफोन चार्ज करण्यासाठी कोणत्याही वायरची आवश्यकता नसते. मात्र, वायरलेस चार्जर चालू राहण्यासाठी वॉलशी प्लग करणे गरजेचे असते. ज्यामुळे हे तंत्र चांगल्या पद्धतीने काम करते. 

 • This Way Wireless Charger Works

  - तुम्ही तुमचा फोन वायरलेस चार्जरव ठेवला.
  - त्यानंतर भिंतीतून येणारी वीज तुमच्या वायरलेस चार्जरमध्ये येऊन मॅग्नेटिक फिल्ड तयार करते. 
  - या मॅग्नेटिक फिल्डचे रुपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होते. याचा वापर मोबाईलमधील बॅटरी चार्ज करण्यासाठी होतो.
  - डिव्हाईसमध्ये वायरलेस चार्जर सपोर्ट करण्यासाठी योग्य हार्डवेअर असण्याची आवश्यकता असते. आवश्यक असलेल्या कॉईलशिवाय डिव्हाईसची चार्जिंग होऊ शकत नाही. 

 • This Way Wireless Charger Works
  या स्मार्टफोनमध्ये आहे वायरलेस चार्जिंग सुविधा
   
  - आयफोन 8, आयफोन 8 प्लस, आयफोन एक्स
  - सॅमसंग गॅलॅक्सी नोट 8 आणि नोट 5
  - सॅमसंग गॅलॅक्सी S8, S8+, S8 Active, S7, S7 Edge, S7 Active
  - एलजी G6 (US and Canada versions only) आणि एलजी V30
  - मोटोरोला मोटो Z, मोटो Z Play, मोटो Z2 Force, मोटो Z2 Play 

Trending