आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठा खुलासा: WhatsApp चॅट सुरक्षित नाही, कोणीही जाणून घेऊ शकतो या गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅझेट डेस्क :  व्हाट्सअॅप हे रोजच्या वापरातील एक अविभाज्य भाग बनले आहे.  व्हाट्सअॅपचे मॅसेज पाहिल्याशिवाय काही लोकांना करमत नाही. एकापेक्षा अधिक जण एकाचवेळी गप्पा करण्यासाठी WhatsApp चे वेगवेगळे ग्रुप बनवतात. मात्र आता WhatsApp वर ग्रूप चॅट  सुरक्षित राहिलेले नाही. नुकत्यात समोर आलेल्या रिपोर्टनुसार, तुमचे WhatsApp ग्रुप चॅट कोणताही यूझर पाहू शकतो. जर्मनीच्या क्रिप्टोग्राफर्सच्या एका टिमने आपल्या रिपोर्टमध्ये उल्लेख केला आहे की, अॅंड-टू-एंड इनक्रिप्शन असणारे WhatsApp चॅटला कोणतेही युझर पाहू शकतात.  

 

रीपोर्टमध्ये म्हटले आहे की, अॅडमिनच्या परवानगीशिवाय ग्रुपमध्ये कोणीही घुसू शकते. या अॅपच्या सिक्युरिटी पॉलिसीवर अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. 

 

कोणीही पाहू शकतो ग्रुप चॅट
जर्मनीच्या Ruhr University bochum च्या क्रिप्टोग्राफर्सने स्वित्झरलंडच्या ज्यूरीखमध्ये झालेल्या रियल वर्ल्ड क्रिप्टो सेक्युरेटी कॉन्फरन्समध्ये WhatsApp ग्रुपच्या सुरक्षितेतील काही कमतरतेला स्पष्ट करण्यात आल्या. रिपोर्टनुसार, ग्रुप चॅट सुरक्षित प्लॅटफॉर्म नाही आणि युझर्सच्या चॅटला कोणीही पाहू शकतात. अॅडमिनला न सांगताही आपण ग्रुप मेंबर बनू शकता.


पुढील स्लाइडवर जाणून घ्या WhatsApp ग्रुपमध्ये कसे परवानगीशिवाय मेंबर बनू शकता..

बातम्या आणखी आहेत...