अशी मिळवा फोनची Important माहिती, प्रत्येक युझरला माहिती हवेत हे 4 सिक्रेट कोड
फोनशी निगडित काही अशा सेटिंग्ज आहेत ज्यांच्याबाबत अनेक युजर्सना माहिती नाही. या सेटिंगच्या माध्यमातून कॉल फॉरवर्ड करण्या
-
गॅजेट डेस्क- फोनशी निगडित काही अशा सेटिंग्ज आहेत ज्यांच्याबाबत अनेक युजर्सना माहिती नाही. या सेटिंगच्या माध्यमातून कॉल फॉरवर्ड करण्यासोबतच फोनला ट्रॅकही केले जाऊ शकते. तथापि, या सर्व सर्व सर्व्हिसेस USSD कोडद्वारे अॅक्टिव्ह आणि डिअॅक्टिव्ह होतात. या सर्व्हिसेस टेलिकॉम कंपन्यांद्वारे दिल्या जातात. पण म्हणून तुम्ही ज्या कंपनीची सर्व्हिस घेताय त्यावर USSD सर्व्हिस अॅक्टिव्ह असणे गरजेचे नाही. उदा. रिलायन्स जिओने आपल्या सर्व USSD सर्व्हिस ब्लॉक करून ठेवल्या आहेत. पण तुम्ही हे कोड एकदा अप्लाय करून पाहायला पाहिजेत.
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, या सिक्रेट कोडबाबत...
-
Code 1: *#21#
या कोडच्या मदतीने कळते की तुमच्या नंबरचा Data, Voice, Fax, SMS, Sync, Async, Packet access आणि Pad फॉरवर्ड होत आहे अथवा नाही. -
Code 2: *#62#
जर तुमच्या नंबरवर नो सर्व्हिस किंवा नो आन्सर येत असेल, तर तुम्ही हा कोड डायल केला पाहिजे. हा कोड तुमचे कॉल, मेसेज व डाटाशी संबंधित सर्व्हिसेस अॅक्टिव्ह करतो. -
Code 3: ##002#
हा सर्वात कामाचा कोड आहे. जर तुमच्या नंबरवर कोणतीही सर्व्हिस उदा. कॉल वा अन्य फॉरवर्ड होत असेल तर या कोडच्या माध्यमातून त्याला रोखले जाऊ शकते.