आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RCom ने रिलायन्स Jio ला विकल्या वायरलेस अॅसेट्स, 45 हजार कोटींचे कर्ज कमी होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रिलायन्स कम्युनिकेशन्स (आर-कॉम) ४५ हजार कोटी रुपयांचे कर्ज चुकविण्यासाठी रिलायन्स जिओला वायरलेस अॅसेट्स विकणार आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये डील झाली आहे. पण याच्या बदल्यात रिलायन्स जिओ किती पैसे देणार आहे याचा नेमका आकडा मात्र पुढे आलेला नाही. बाजारपेठेतील तज्ज्ञांनी ही २५ हजार कोटी रुपयांची डील असल्याचे सांगितले आहे. अनिल अंबानी यांच्या कंपनीच्या अॅसेट्ससाठी जिओने मोठी बोली लावली होती.

 

RCom ने बयान देताना काय सांगितले
- RCom ने गुरुवारी दिलेल्या वक्तव्यात सांगितले, की वायरलेस स्पेक्ट्रम, टॉवर, फायबर आणि मीडिया कनव्हर्जन्स नोड (एमसीएन) अॅसेट्सची विक्री करण्यासाठी रिलायन्स जिओ इन्फोकॉमसोबत करार केला आहे. व्हॅल्यूएबल अॅसेट्ससाठी कॉम्पिटिटिव्ह प्रोसेसला पुढे वाढविण्यासाठी एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेडसह मिळून काम करेल.

 

RCom च्या अॅसेट्सला टेकओव्हर करेल रिलायन्स जिओ
-  800/900/1800/2100 मेगाहर्ट्ज बॅंडमध्ये 122.4 मेगाहर्ट्ज 4 जी स्पेक्ट्रम.
- टॉवर बिझनेस. कंपनीकडे ४३ हजार टॉवर्स आहेत. ही कंपनी देशाच्या टॉप ३ इंडिपेंडंट टॉवर होल्डिंग्जमध्ये सामिल होती.
- फायबर बिझनेस
- २४८ मीडिया कनव्हर्जन्स नोड्स. टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर होस्टिंगसाठी याचा वापर केला जातो.

 

जिओने लावली मोठी बोली
- आर-कॉमने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या अॅसेट्स व्हॅल्यूएशनसाठी एक कमेठी तयार करण्यात आली होती. त्यानंतर बोली लावण्यात आली. त्यात रिलायन्स जिओने सर्वात जास्त बोली लावली. ही प्रोसेस मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होईल.
- या पैशांमधून कंपनीचे कर्ज कमी केले जाईल. डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉमने स्पेक्ट्रमच्या इंन्स्टॉलमेंटसाठी हे वापरले जाईल.

 

पुढील स्लाईडवर वाचा, या डीलशी संबंधित माहिती... अखेर भाऊच आला भावाच्या कामी....

बातम्या आणखी आहेत...