आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा ब्रांडेड एअर कंडीशनर 30 वर्ष देईल फ्री थंडी हवा, 1 रुपयाही येणार नाही वीजबील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅझेट डेस्क- सध्या मार्केटमध्ये अनेक प्रकारचे एअर कंडीशनर (AC) आले आहेत. यात अनेक नव्या कंपण्यांचा देखील समावेश आहे. यामध्ये 2 स्टार ते 5 स्टारपर्यंतचे AC आहेत. एअर कंडीशनरचा वापर केल्याने वीजेचे बील सर्वात जास्त येते. ACची रेटींग 5 स्टार जरी असली, तरी त्याच्या बीलात फासरा फरक पडत नाही. या सर्व प्रकारात व्हिडिओकॉन आपले हायब्रीड सोलर AC घेऊन आले आहे. यामुळे वीजेचे कोणतेही बील येणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे.


वीजबील येणार नाही...
हा AC पुर्णपणे सौर उर्जेवर चालतो असा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे या ACसाठी वीजेचे बील येणार नाही. कंपनी AC सोबत सोलार पॅनल प्लेट आणि DC आणि AC कन्वर्टर देखील सोबत देते. त्यामुळे यासाठी तुम्हाला वेगळे पैसे मोजावे लागणार नाही. ही प्लेट कोणत्याही वातावरणात काम करेल आणि तिचा मेंटेनन्स खर्च देखील अतिशय तुरळक  कमी आहे. कंपनीने हा AC दोन वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये काढला आहे. यात 1 टन आणि 1.5 टन ACचा समावेश आहे.
 


एवढी आहे किंमत....
व्हिडिओकॉनने 1 टन आणि 1.5 टन कॅपॅसिटीचे AC काढले आहेत. यात 1 टन कॅपॅसिटी असलेल्या ACची किंमत 99 हजार तर 1.5 टनच्या ACची किंमत 1.39 लाख रुपये आहे. या किमतीत कंपनी तुम्हाला सोलार पॅनल प्लेट आणि DC ते AC कन्वर्टर देखील देते. जेव्हा उन असेल तेव्हा हा AC काम करेल. रात्री हा AC काम करणार नाही. त्यासाठी तुम्हाला एक लाख रुपयांची बॅटरी वेगळी खरेदी करावी लागेल. जी रात्रभर AC चालू ठेऊ शकेल. एवढ्या खर्चात तुम्ही 25 ते 30 वर्ष मोफत थंड्या हवेचा आनंद घेऊ शकता असा दावा कंपनीने केला आहे.


पुढील स्लाइडवर पाहा, व्हिडिओकॉन ACचे काही फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...