Home | Business | Gadget | Wearing Black Bra Causes Cancer Know Truth Behind This Viral Whatsapp Message

Black Bra ने स्तनांच्या कर्करोगाचा धोका, सोनालीसोबतही असेच झाले? वाचा Viral मेसेजचे सत्य

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 24, 2018, 12:25 PM IST

ब्लॅक ब्रा घातल्याने स्तनांच्या कर्करोगाचा धोका वाढतो. सोनाली बेंद्रसोबत असेच काही झाले असा दावा यात केला जात आहे.

 • Wearing Black Bra Causes Cancer Know Truth Behind This Viral Whatsapp Message

  गॅजेट डेस्क - अभिनेत्री सोनाली बेंद्रेला हाय ग्रेड कॅन्सर झाल्यानंतर सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल केला जात आहे. ब्लॅक ब्रा घातल्याने स्तनांच्या कर्करोगाचा धोका वाढतो. सोनाली बेंद्रसोबत असेच काही झाले असा दावा यात केला जात आहे. एवढेच नव्हे, तर उन्हात बाहेर पडताना छातीला नेहमीच दुपट्टा किंवा कपड्याने झाकून ठेवावे असा सल्ला देखील दिला जात आहे. या मेसेजमध्ये दावा केला जात आहे, की तो टाटा मेमोरियल हॉस्पिटलने शेअर केला आहे. सोबतच, हा मेसेज बिनधास्तपणे जास्तीत-जास्त महिलांना पाठवा असे आवाहन केले जात आहे.


  काय आहे या व्हायरल मेसेजचे सत्य?
  - हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे. आम्ही टाटा मेमोरियल हॉस्पिटलशी संवाद साधला असताना त्यांनी अशा प्रकारचा कुठलाही मेसेज जारी केला नाही असे स्पष्ट केले. या मेसेजमध्ये खाली एक नंबर देण्यात आला आहे. तो देखील खोटा निघाला. हा नंबर टाटा रुग्णालयाचा नाही.
  - सोबतच आम्ही भोपाळ येथील कृष्णा कॅन्सर रुग्णालयातील मेडिकल आँकोलॉजिस्ट डॉक्टर सुनील कुमार यांच्याशी बातचीत केली. त्यांनी देखील हा मेसेज खोटा असल्याचे सांगितले. काळ्या रंगाची ब्रा घातल्याने स्तनांच्या कर्करोगाचा धोका वाढतो असे काहीच नाही. व्हायरल मेसेजमध्ये उन्हात छाती झाकण्याचा सल्ला देण्यात आला होता. परंतु, उन्हात स्किन कॅन्सर होऊ शकतो, ब्रेस्ट कॅन्सर शक्यच नाही असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले.
  - ब्रेस्ट कॅन्सर प्रामुख्याने हार्मोन्समध्ये झालेल्या असमतोलामुळे उद्भवू शकतो. काही प्रकरणांमध्ये अधिक प्रमाणात मद्यपान करणाऱ्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची उदाहरणे आहेत.


  सोशल मीडियावर 25% फेक न्यूज आरोग्य विषयी
  - फेक न्यूज चेक करणारी वेबसाइट check4spam.com चे सह-संस्थापक शॅमस ओलिएथ यांनी सांगितले, सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या फेक न्यूजपैकी 25 टक्के फक्त आरोग्य आणि वैद्यकीय उपचार संदर्भात असतात. अशा प्रकारच्या बातम्यांना कुठलाही आधार नसतो. देशात लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांची कमतरता हे सोशल मीडियावर आरोग्यविषयी फेक न्यूज व्हायरल होण्यामागचे कारण आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 100 कोटी नागरिकांवर फक्त 10 लाख अॅलोपॅथिक डॉक्टर आहेत.


  सोनाली बेंद्रेला मेटॅस्टेटिक कॅन्सर
  सोनाली बेंद्रेने नुकतेच सोशल मीडियावर आपल्याला कर्करोग असल्याचे जाहीर करत करोडो चाहत्यांना धक्का दिला. तिने आपल्याला मेटॅस्टेटिक कॅन्सर असल्याचे म्हटले आहे. हा कर्करोगाचे सर्वात गंभीर स्वरूप आहे. अशात परिस्थितीत कॅन्सरचे ट्यूमर शरीरात झपाट्याने एका भागातून दुसऱ्या भागात पसरतात. याला चौथ्या स्टेजचा कॅन्सर असेही म्हणतात. कॅन्स सेल्स शरीराच्या एका भागातून दुसऱ्या भागात फैलावण्याच्या प्रक्रियेला मेटॅस्टेसिस म्हटले जाते. कॅन्सरच्या स्टेज आणि ग्रेडमध्ये फरक असतो. कर्करोगाच्या स्टेजवरून तो शरीरात किती पसरला याची माहिती घेता येते. तर ग्रेडमध्ये ट्यूमरची शरीरात फैलावण्याची क्षमता मोजली जाते.

Trending