आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Jio : जियोफोन-2, गिगा फायबर सर्व्हीस, मानसून ऑफरसह अंबानींनी केल्या या 10 घोषणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅझेट डेस्क -  रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानींनी गुरुवारी रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना जियोने एका वर्षात ग्राहकांचा आकडा दुप्पट केला असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी कंपनीचा लेखाजोखा मांजला. तसेच यावेळी आकाश अंबानी आणि ईशा अंबानी जियोशी संबंधित 10 महत्त्वाच्या घोषणा केल्या. 


#1. जियोफोन-2 लाँच 
यावेळी जियोफोन-2 लाँच करण्यात आला. याची किंमत 2999 ठेवली आहे. जुन्या फोनच्या तुलनेत यात अनेक नवे फिचर्स दिले जातील. तसेच भारतीय भाषांचाही समावेश असेल. क्वार्टी किपॅड आणि मोठी स्क्रीन असेल. याच अनेक हायटेक फिचर्सही असतील. 

 

#2. नवा जियोफोन 501 रुपयांत 
नवा फोन लाँच केल्यानंतर जुन्या जियोफोनची किंमत 1500 हून 501 वर आणली आहे. त्यानुसार 21 जुलै पासून 'मान्सून हंगामा' ऑफर सुरू होईल. त्यात कोणताही जुना फिचर फोन देऊन 501 रुपयांत नवा जियोफोन खरेदी करता येईल. 

 

#3. व्हाट्सअॅपही चालणार 
गेल्यावर्षी लाँच केलेल्या जियो फीचर फोनमध्ये व्हाट्सअॅप चालवता येत नव्हते. पण आता नव्या फोनमध्ये व्हाट्सअॅप, यूट्यूब आणि फेसबूक अॅप चालेल. ते व्हाइस कमांडलाही सपोर्ट करेल. या सर्व अॅपची फॅसिलिटी 15 ऑगस्टपासून जियोफोन यूझर्सला मिळेल. 

 

#4. जियो गिगा फायबर ब्रॉडबँड सर्व्हीस सुरू 
अंबानींनी यावेळी रिलायन्स जियोची ब्रॉडबँड सर्व्हीस 'जियो गिगा फायबर' सुरू करण्याची घोषणाही केली. त्यांनी सांगितले की, या सर्व्हीससाठी 15 ऑगस्टपासून नोंदणी सुरू होईल. देशभरात 1100 शहरांत ही सेवा काम करेल. 

 

#5. एका तासात इन्स्टॉल होणार जियो फायबर
मुकेश अंबानींनी सांगितले की, गिगा फायबर सर्व्हीस बुकींगनंतर एका तासात इन्स्टॉल केली जाईल. यामुळे घर पूर्णपणे हायटेक बनेल. यावेळी ईशा अंबानी म्हणाल्या, आधी इंटरनेटची स्पीड Mbps मध्ये मोजली जायची आता Gbps मध्ये मोजली जाईल.


#6. जियो गिगा टिव्ही लाँच 
यावेळी गिगा टिव्हीची घोषणाही करण्यात आली. गिगा फायबर सर्व्हीसच्या मदतीने ते चालेल. या टि्व्हीवर जगातील उच्च दर्जाचा शैक्षणिक कंटेंट मिळेल. तसेच शिक्षक नसतानाही मुलांना शिकता येईल. याच्या मदतीने डॉक्टर लांबून रुग्णावर उपचार करू शकतील. गिगा टिव्ही जियोचा सेट-टॉप बॉक्स असेल. 

 

#7. 15 वर्षांनंतर जियोची मान्सून हंगामा ऑफर
1 जुलै 2003 ला 501 रुपयांत मोबाईल फोन देत मोबाइल क्रांतीची घोषणा केली होती. यावेळी मुकेश आणि अनिल अंबानी एकत्र होते. याला 'धीरूभाई अंबानी पायोनियर' ऑफर नाव होते. 

 

#8. जियो गिगा राऊटर, सर्व्हीलान्स सिस्टीम 
अंबानींनी या दरम्यान गिगा राऊटर सुरू करण्याचीही घोषणा केली. त्याद्वारे घरात वाय फाय चालवता येईल. तसेच घरांच्या सुरक्षेसाठी जियो कॅमेरे आणि सर्व्हीलान्स सिस्टीमही सुरू करण्याची घोषणा केली. 

 

#9. ई-कॉमर्स व्हेंचरही सुरू होणार 
अंबानींनी सांगितले की, त्यांची कंपनी ई-कॉमर्स व्हेंचरही सुरू करणार आहे. त्यासाठी देशभरातील किराणा स्टोअर्सशी टायअप केले जाणार आहे. त्यांनी सांगितले की, सध्या रिलायन्स रिटेल स्टोअरचे 35 कोटी ग्राहक आहेत. तर जियोचे 21.5 कोटी ग्राहक आहेत. 


#10. जियोचा नफा 20.6% वाढला
मुकेश अंबानींनी सांगितले की, रिलायन्स जियोचा नफा 20.6% टक्क्यांहून वाढून 36 हजार 75 कोटी झाली आहे. रिलायन्स भारतातील सर्वात मोठी निर्यातदार कंपनी बनल्याचेही ते म्हणाले. कंपनीने वर्षभरात 42 हजार 553 कोटींची जीएसटी भरणा केला असल्याचेही ते म्हणाले. 

 

बातम्या आणखी आहेत...