Home | Business | Gadget | Follow This Process To Make Collar Mic At Home

फक्त 40 रुपयांत घरबसल्या तुम्हीही बनवू शकतात रेकॉर्डिंग करणारा कॉलर माइक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 06, 2018, 10:49 AM IST

तुम्हाला कॉलर माइकचा वापर करायचा असेल तर 300 ते 500 रुपये खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त 40 रुपये खर्च करून घरबसल्य

 • Follow This Process To Make Collar Mic At Home

  गॅजेट डेस्क- तुम्हाला कॉलर माइकचा वापर करायचा असेल तर 300 ते 500 रुपये खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त 40 रुपये खर्च करून घरबसल्या कॉलर माइक बनवू शकतात. परंतु, माइक बनवण्यासाठी तुमच्याकडे सोल्डेरिंग मशीन असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे मशीन नसेल तर त्यासाठी 150 रुपये अतिरिक्त खर्च करावा लागेल.

  घरबसल्या कॉलर माइक बनवण्याच्या आम्ही आपल्याला काही ट्रिक सांगत आहोत.

  कॉलर माइकसाठी या वस्तू गरजेच्या...
  1. ऑडिओ केबल पिन- 20 रुपये
  2. बटन माइक - 15 रुपये
  3. टेप- 5 रुपये
  4. दोर्‍याच्या रिलचा बॉक्स
  5. वेलवेटच्या कापडाचा छोटा तुकडा
  6. सोल्डेरिंग मशीन
  7. कटर

  पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या.. कॉलर माइक बनवण्याची प्रोसेस...

 • Follow This Process To Make Collar Mic At Home

  Step 1
  सर्वात आधी रिलच्या तुकड्याला वरच्या बाजुने कापून त्यात माइक बसवून बघा.

 • Follow This Process To Make Collar Mic At Home

  Step 2
  कटरने ऑडिओ केबल कापा. त्यातून निघणार्‍या तीन पैकी लाल वायर निगेटिव्ह पॉइंटला जोडा. यासाठी सोल्डरिंग मशीन वापरावे लागेल.

 • Follow This Process To Make Collar Mic At Home

  Step 3
  निगेटिव्ह पॉलवर थ्री डॉट्‍सची मार्किंग माइकवर दिसेल.

 • Follow This Process To Make Collar Mic At Home

  Step 4
  आता ग्रीन आणि ब्ल्यू वायर माइकच्या दुसर्‍या पोलवर जोडावी. याला पॉझिटिव्ह पोल म्हटले जाते. याप्रमाणे माइक तयार होईल.

 • Follow This Process To Make Collar Mic At Home

  Step 5
  माइकला फोनवर चेक करून पाहा.

 • Follow This Process To Make Collar Mic At Home

  Step 6
  माइक रिलमध्ये फिक्स करून पॅक करा. 

 • Follow This Process To Make Collar Mic At Home

  Step 7
  आता रिल आणि वायर टेपने रॅप करा. त्यावर वेलवेट कापडाचा तुकडा गुंडाळा. नंतर रबर बॅंडने घट करून घ्या.

 • Follow This Process To Make Collar Mic At Home

  Step 8
  एक्स्ट्रा वेलवेट कापड कात्रीने कापून घ्या. नंतर  त्याला क्लिप जोडून घ्या. तुमचा स्वस्त माइल तयार झाला आहे.

 • Follow This Process To Make Collar Mic At Home

  Step 9
  फोनला कनेक्ट करून तुम्ही सहज रेकॉर्डिंग करू शकतात. 

Trending