Home | Business | Gadget | Nokia 6 And Samsung Galaxy S8 Got Price Cut

2 दिवसात स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन, इतकी कमी झाली किंमत

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 03, 2018, 05:44 PM IST

तुम्ही फोन खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. samsung, नोकिया या नामांकित कंपन्यांनी आपल्य

 • Nokia 6 And Samsung Galaxy S8 Got Price Cut

  यूटिलिटी डेस्क- तुम्ही फोन खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. samsung, नोकिया या नामांकित कंपन्यांनी आपल्या फोनच्या किमती कमी केल्या आहेत. या किमती मागील 2 दिवसात कमी झाल्या आहेत. सॅमसंगने आपल्या लेटेस्ट फोन S8 आणि S8+ ची किंमत कमी केली आहे. नोकियाने नोकिया 6 ची किंमत कमी केली आहे. चला जाणून घेऊ या कोणत्या फोनची किंमत किती कमी झाली.

  nokia 6

  nokia 6 लॉन्च केल्यानंतर दुसऱ्या वेळेस स्वस्त झाला आहे. या फोनचे 3 जीबी रॅम वेरिएंट गतवर्षी जूनमध्ये लॉन्च करण्यात आले. लॉन्चच्या वेळी या फोनची किंमत 14,999 रुपये होती. त्यानंतर या फोनची किंमत 1500 रुपयांनी कमी करण्यात आली. आता हा फोन पुन्हा एकदा 500 रुपयांनी स्वस्त करण्यात आला आहे. ज्यानंतर तो केवळ 12,999 मध्ये खरेदी केला जाऊ शकतो. नव्या किमतीसह तो अॅमेझॉनवरुन तुम्ही खरेदी करु शकता.

  पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 • Nokia 6 And Samsung Galaxy S8 Got Price Cut

  Samsung Galaxy S8
  सॅमसंगने आपल्या प्लॅगशिप मॉडेल Galaxy S8 आणि Galaxy S8 plus च्या किमती कमी केल्या आहेत. असे galaxy S9 च्या लॉन्च नंतर घडले आहे. गैलेक्सी Galaxy S8 आता 8000 रुपयांनी स्वस्त झाला आहे. तो तुम्ही  49,990 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. तर Galaxy S8 plus ची किंमत 11000 रुपयांनी स्वस्त झाला आहे. तो तुम्ही 53,990 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. असे सांगण्यात येते की S9 लॉन्च केल्यानंतर सॅमसंगने या दोन्ही हॅन्डसेटच्या किंमती कमी केल्या आहेत. 

   

Trending