आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Jio ला एअरटेलची जोरदार टक्कर, दोन प्लॅनमध्ये केले मोठे फेरबदल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- टेलिकॉम इंडस्ट्रीत रिलायन्स जिओच्या एन्ट्रीनंतर कंपन्यांमध्ये प्राईस वॉर छेडले होते ते अजूनही दिसून येत आहे. विशेष म्हणजे रिलायन्स जिओला देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेलने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एअरटेलने दोन प्रीपेड प्लॅनमध्ये बदल केले आहे. एअरटेलचेे हे प्लॅन ३४९ रुपये आणि ५४९ रुपयांचे आहेत. दोन्ही प्लॅनमध्ये कंपनीने ग्राहकांची डाटा लिमिट वाढवली आहे.

 

३४९ रुपयांचा प्लॅन
या प्लॅनची माहिती द्यायची झाली तर आता ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग (लोकल, एसटीडी आणि रोमिंग) यासह २८०० लोकल आणि नॅशनल एसएमएस मोफत मिळतील. या प्लॅनची वैधता २८ दिवसांची असून त्यात ५६ जीबी डाटा दिला जातो. अशा प्रत्येक रोज ग्राहकांना २ जीबी डाटा मिळेल.

 

५४९ रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये ग्राहकांना एनलिमिटेड कॉलिंग (लोकल, एसटीडी, रोमिंग) यासह २८०० लोकल आणि नॅशनल एसएमएस मोफत मिळतील. या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. आता या प्लॅनमध्ये ग्राहकांना ८४ जीबी डेटा मिळेल. अशा प्रकारे दररोज ३ जीबी डेटा मिळणार आहे.

 

आधी कसा होता प्लॅन
३४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना १ जीबी डाटा प्रत्येक दिवशी मिळायचा. आता हा दुप्पट करण्यात आला आहे. अशा प्रकारे ५४९ रुपयांचा प्लॅन घेतला तर आधी २ जीबी डाटा मिळायचा. आता तो ३ जीबी करण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...