आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- कन्झुमर ड्युरेबल कंपनी एसी, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, एअर प्योरिफायर आदींवर स्टॉक क्लिअरन्स सेल देत आहे. व्हिडिओकॉन, सॅमसंग, एलजी, व्हर्लपूल आदी कंपन्यांनी डीलर कस्टमरना १० ते ५० टक्के डिस्काऊंट ऑफर केला आहे. याचा फायदा कस्टमर ३१ डिसेंबरपर्यंत उचलू शकतात.
एसी-टीव्हीवर डिस्काऊंट
मल्टीब्रांड कन्झुमर ड्युरेबल रिटेल स्टोअर विजय सेल्सचे एमडी निलेश गुप्ता यांनी सांगितले, की व्हिडिओकॉन, सॅमसंग, एलजी, व्हर्लपूल सारख्या अनेक कंपन्यांनी १० ते ५० टक्के डिस्काऊंटवर वस्तू बाजारपेठेत आणल्या आहेत. हा स्टॉक क्लिअरन्स सेल आहे. एसी, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन आदी वस्तूंवर तो देण्यात येत आहे. ३१ डिसेंबरपर्यंत हा सेल राहणार आहे.
रिटेलर्स देत आहे डिस्काऊंट
मल्टीब्रांड कन्झुमर ड्युरेबल रिटेल स्टोअर सरगमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की आमच्या दुकानांवर ४० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट देण्यात येत आहे. हा डिस्काऊंट सर्व ब्रांडवर ३१ डिसेंबरपर्यंत देण्यात येईल. मोठ्या रिटेलर्सप्रमाणेच लहान दुकानदारही ३० टक्क्यांवर डिस्काऊंट देत आहेत.
लग्नात वाढला सेल
गुप्ता यांनी सांगितले, की आता जीएसटीचा परिणाम कमी झाला आहे. जीएसटीचा निगेटिव्ह परिणाम सेलवर दिसत होता. पण आता यात सुधारणा झाली आहे. आता आधी सारखाच सेल सुरु आहे.
इंडस्ट्रीज वाढवू शकतात किमती
व्हिडिओकॉनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की डॉलर महाग झाला आहे. कॉपर आणि स्टीलच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे कन्झुमर ड्युरेबल कंपन्यांचे कॉस्टिंग वाढले आहे. गेल्या वर्षी कॉपर ५,५०० डॉलर प्रति टन होते. यावर्षी ते वाढून ६,८०० डॉलर प्रति टन झाले आहे. एसीत ७० टक्क्यांवर कॉपर वापरले जाते. तसेच फ्रिज, एसी, किचन एप्लायन्सेस, किचन इक्विपमेंट याच्या किमती २ ते ४ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. जीएसटी लागू झाल्याने किमती वाढवणे शक्य नव्हते. त्यामुळे जुना स्टॉक मार्केटमध्ये आला होता.
पुढील स्लाईडवर वाचा, इंडस्ट्रीज वाढवू शकतात किमती... नवीन वर्षात वाढतील किमती... ६५ हजार कोटी रुपयांचे मार्केट...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.