Home | Business | Gadget | fake news busted truth behind the whatsapp viral message

WhatsApp वर खोटी माहिती पाठवताच होईल Red? काय आहे या Viral मेसेजचे सत्य

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 21, 2018, 01:13 PM IST

WhatsApp वर सध्या एक मेसेजे व्हायरल होत आहे. यानुसार, व्हॉट्सअॅपवरून खोटा मेसेज पाठवल्यास त्या मेसेजचे रंग लाल होईल.

 • fake news busted truth behind the whatsapp viral message

  गॅजेट डेस्क - WhatsApp वर सध्या एक मेसेजे व्हायरल होत आहे. यानुसार, व्हॉट्सअॅपवरून एखादा खोटा मेसेज पाठवल्यास त्या मेसेजचे रंग लाल होईल. सोबतच, ज्याने पाठवलेला मेसेज लाल झाला, त्याला तुरुंगात जावे लागेल. पोलिस लाल WhatsApp मेसेजेसवर बारकाइने नजर ठेवून आहेत असा दावा सुद्धा यात केला जात आहे. व्हॉट्सअॅपचे नवीन अपडेट आले आहे. त्यामुळे, यापुढे प्रत्येक मेसेज व्यवस्थित वाचून तो खरा असल्यासच पुढे पाठवावा अन्यथा तो रेड होईल आणि पोलिस तुम्हाला अटक करतील असा इशारा त्यामध्ये दिला जात आहे.


  आमच्या तपासात समोर आलेले 3 मुद्दे
  1- आम्ही या कथित व्हॉट्सअॅप मेसेजचा तपास केला. त्यानुसार, हा मेसेज बनावट असल्याचे समोर आले आहे. WhatsApp ने आपल्या अपडेटमध्ये खोटे मेसेज लाल करणारे फीचर दिलेले नाही. त्यामुळे, पोलिस तुमच्या मेसेजेसवर लक्ष ठेवतील हे शक्यच नाही.
  2- फेक न्यूज रोखण्यासाठी WhatsApp ने नुकतेच एक दुसरे फीचर दिले आहे. त्यामध्ये एखाद्या मेसेजला 'फॉरवर्डेड लेबल' दिले जात आहे. जेणेकरून आपल्याला मिळणारा संदेश हा समोरील व्यक्तीने नव्हे, तर जशास तसा अफवा पसरवण्यासाठी फॉरवर्ड होऊन तुमच्या पर्यंत आला हे कळेल.
  3- यासह WhatsApp एका नवीन फीचरवर चाचण्या घेत आहे. यामध्ये यात कुठलाही एक फोटो किंवा व्हिडिओ 5 व्यक्ती किंवा 5 ग्रुपमध्येच फॉरवर्ड केला जाऊ शकेल. या व्यतिरिक्त WhatsApp च्या मते, ते मीडिया मेसेजमधून फॉरवर्डचे बटन हटवण्याचा देखील विचार करत आहेत.


  पोलिस का ठेवू शकत नाही मेसेजवर पाळत?
  ही गोष्ट WhatsApp ची प्रायव्हेसी पॉलिसी वाचल्यावर लक्षात येईल. त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, की आपण करत असलेली चॅटिंग, फोटो आणि व्हिडिओ एन्क्रिप्टेट आहेत. अर्थात अशा कोडमध्ये परिवर्तित केले जात आहेत, की तिसरी व्यक्ती कुठेही बसून ते पाहू शकणार नाही. सरकारने नुकतेच ऑनलाइन डेटा गोळा करण्यासाठी सोशल मीडिया हब बनवण्याची तयारी केली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने त्यास मूलभूत हक्कावर गदा असल्याचे म्हटले. यानंतर सरकारला तो प्लॅन गुंडाळावा लागला.


  व्हॉट्सअॅपवरून होऊ शकतो जन्मठेप
  आयटी अॅक्ट 2008 नुसार, देशद्रोह किंवा देशविरोधी भावना भडकावणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात कलम 66 एफ अंतगर्त जन्मठेपेसाठी खटला चालवला जाऊ शकतो. अश्लील मेसेज किंवा इमेज पाठवल्यास 67ए अंतर्गत 5 वर्षांची कैद, ते लहान मुलांशी संबंधित असतील तर 67 बी नुसार 7 वर्षांची कैद आणि 10 लाखांचा दंड ठोठावले जाऊ शकते. या व्यतिरिक्त भारतीय दंड विधान (आयपीसी) कलम 153 ए, 295ए, 294, 509 अंतर्गत आक्षेपार्ह मेसेज पाठवल्यास कठोर कारवाईची तरतूद आहे.

 • fake news busted truth behind the whatsapp viral message
 • fake news busted truth behind the whatsapp viral message

Trending