आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद झाले जगातील सर्वात लोकप्रीय Instant Messenger; 20 वर्षांपूर्वी होते एकमेव चॅटिंग प्लॅटफॉर्म

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क - जगातील सर्वात लोकप्रीय चॅटिंग प्लॅटफॉर्म याहू मेसेंजर (Yahoo Messenger) 17 जुलै 2018 पासून बंद झाले आहे. 2000 च्या दशकातील तरुणाईमध्ये या प्लॅटफॉर्मची वेगळीच क्रेझ होती. कारण त्यावेळी हे जगात चॅटिंग आणि इंस्टंट मेसेजिंगचे एकमेव प्लॅटफॉर्म होते. 1998 मध्ये सुरू झालेले याहू मेसेंजर अवघ्या काही महिन्यातच इतके विकसित झाले की 20 कोटी लोक याच्याशी जोडले गेले होते. त्यावेळी मोबाईल इंटरनेटची सुविधा आजच्यासारखी नव्हती. सोबतच, मोबाईल इंटरनेट प्रचंड महाग होती. या सर्व गोष्टींचा विचार केल्यास याहू मेसेंजर आपल्या काळातील सर्वात मोठे चॅटिंग माध्यम होते. काळानुरूप स्वतःमध्ये बदल नाही करण्याचा फटका या प्लॅटफॉर्मला बसला आहे. याहू आपल्या यूझर्ससाठी लवकरच नवीन आणि आधुनिक मेसेजिंग प्लॅटफॉर्म घेऊन येत आहे असा दावा या कंपनीने केला आहे. 


हिस्‍ट्री डाउनलोड करण्याचे दिले होते ऑप्‍शन
याहू मेसेंजरने गेल्या महिन्यातच आपल्या सेवा बंद होणार असल्याची घोषणा केली होती. तसेच जाताना आपल्या यूझर्सला एक सुविधा दिली. जेणेकरून ते आपल्या 6 महिन्यांचे चॅटिंग बॅक-अप करून घेऊ शकतात. 
 

अशी झाली होती सुरुवात
याहूने मार्च 1998 मध्ये आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती. यानंतर जून 1999 मध्ये त्याचे नाव याहू मेसेंजर असे ठेवण्यात आले. 2001 च्या सुरुवातीला हे अॅप इतके लोकप्रीय झाले की यूझर्सची संख्या 1 कोटींपेक्षा अधिक झाली. 8 वर्षांनंतर अर्थात 2012 मध्ये या प्लॅटफॉर्मवर यूझर्सची संख्या 12 कोटींपर्यंत पोहोचली होती. 


पुढे वाचा, याहू मेसेंजर बंद पडण्याची कारणे...

बातम्या आणखी आहेत...