Home | Business | Gadget | govt allows esims hikes mobile connections limit to 18 per persons

अाता सिमकार्डविना चालेल स्मार्टफाेन, एकाला 18 कनेक्शन मिळू शकतील

वृत्तसंस्था | Update - May 19, 2018, 06:20 AM IST

अाता स्मार्टफाेन सिमकार्डशिवाय चालेल. तसेच तुम्हाला माेबाइल अाॅपरेटर बदलल्यानंतर नवीन सिमकार्ड घेण्याचीही गरज नाही. म्हण

 • govt allows esims hikes mobile connections limit to 18 per persons

  नवी दिल्ली - अाता स्मार्टफाेन सिमकार्डशिवाय चालेल. तसेच तुम्हाला माेबाइल अाॅपरेटर बदलल्यानंतर नवीन सिमकार्ड घेण्याचीही गरज नाही. म्हणजे तुम्ही कंपनीत अापला नंबर पाेर्ट केल्यास तुम्हाला सिमकार्ड बदलावे लागणार नाही. ग्राहकाने सर्व्हिस कंपनी बदलली तरी दुसरी माेबाइल कंपनी त्याच सिमकार्डला अपडेट करेल.

  साेप्या शब्दात सांगायचे तर, हे अातासारखे सिमकार्ड नसेल तर साॅफ्टवेअरच्या मदतीने माेबाइल फाेन किंवा डिव्हाइसमध्ये लावलेले असेल. म्हणजे त्यासाठी चिप बसवण्यासारख्या कार्डही गरजच नसेल. सरकारने देशात ई-सिमकार्डच्या वापराला मंजुरी दिली अाहे, त्यानुसार दूरसंचार विभागाने नव्या गाइडलाइन्स जारी केल्या अाहेत. ई-सिमकार्ड माेबाइलमध्ये लावून टेलिकाॅम अाॅपरेटरची माहिती अपडेट करता येऊ शकेल. त्याशिवाय सध्या एका ग्राहकाला नऊ सिमकार्ड घेण्याची असलेली मर्यादा १८ करण्यात अाली अाहे. यापैकी नऊ सिमचा वापर सामान्य माेबाइल फाेन सेवेसाठी तर इतर सिमचा उपयाेग मशीन टू मशीन कम्युनिकेशनसाठी (जसे की डाेंगल किंवा स्मार्टवाॅच) करता येईल. युजरने काेणत्याही माेबाइल कंपनीकडून नवीन कनेक्शन घेतल्यास, त्याच्या स्मार्टफाेनमध्ये इंबेडेड सबस्क्रायबर अायडेंटिटी माॅड्यूल म्हणजेच ई-सिमकार्ड टाकले जाईल.

  ई-सिमचा वापर करणाऱ्या युजरची माहिती टेलिकाॅम कंपन्या अापल्या डाटाबेसमध्ये नाेंद करतील. यात देशातील सुमारे ११५ काेटींहून अधिक युजर्सचा फायदा हाेईल. सर्व टेलिकाॅम कंपन्या ई-सिमची सुविधा देऊ शकतील.

  अाॅपरेटर त्वरित पाेर्ट करता येईल, बॅटरीचे अायुष्यही वाढेल

  ई-सिमला इम्बेडेड सबस्क्रायबर अायडेंटिटी माॅड्यूल म्हटले जाते. हे तंत्रज्ञान साॅफ्टवेअरच्या मदतीने काम करते. सध्या या तंत्रज्ञानाचा वापर स्मार्टवाॅचसाठी केला जाताे, मात्र अाता स्मार्टफाेनमध्येही हाेईल. यात युजर्स फक्त साॅफ्टवेअरच्या मदतीने टेलिकाॅम सेवा घेऊ शकेल. एक अाॅपरेटरकडून दुसऱ्या अाॅपरेटरकडे पाेर्ट करणेही साेपे जाईल. ई-सिम पाेर्ट करण्यासाठी सध्या ७ दिवसांची प्रतीक्षा करावी लागते, मात्र ई-सिममुळे ते त्वरित हाेईल. फाेनच्या बॅटरीचा वापर कमी हाेईल, त्यामुळे बॅटरीचे अायुष्यही वाढेल.

 • govt allows esims hikes mobile connections limit to 18 per persons

Trending