Home | Business | Gadget | Helmet To Connect Mobile App

हेल्मेटशी कनेक्ट असेल अॅप, अपघातानंतर लगेच कुटुंबियांना मिळेल मॅसेज

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 24, 2018, 03:44 PM IST

तुमच्या हेल्मेटला कनेक्ट होणारे एक मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे. अपघातामध्ये एखादा बाईकस्वार जखमी झाला

 • Helmet To Connect Mobile App

  नवी दिल्ली : तुमच्या हेल्मेटला कनेक्ट होणारे एक मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे. अपघातामध्ये एखादा बाईकस्वार जखमी झाला तर त्याची सूचना केवळ 2 मिनिटात त्याच्या नातेवाईकांना मॅसेज अलर्टने मिळेल. यासोबतच ऍम्ब्युलन्सला मॅसेज जाईल. 30 मिनिटांच्या आत जखमी व्यक्तीला आरोग्य सेवा उपलब्ध होईल. या व्यतिरिक्त हे अॅप चालकाला वेगवेगळ्या लोकेशनच्या रूटची माहिती देईल. हे अॅप दिल्लीच्या टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी (डीटीयू)मधील बीटेकच्या विद्यार्थी प्रतीकने तयार केले आहे. या हेल्मेटची किंमत 2500 रु असेल. हे ऑगस्ट महिन्यात बाजारात उपलब्ध होईल.


  - या संपूर्ण अॅप संर्भातील माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि दिल्लीचे ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. यामध्ये पिडीताला एका लाख रुपयांना विमाही देण्यात येईल.


  - प्रतिकने सांगितले की, हे मोबाईल अॅप “मोटो बड्डी’ केंद्र सरकारच्या स्टार्ट अप इंडिया आणि डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन (डीआईपीपी) मान्यता प्राप्त आहे.

  हेल्मेटमधील चिपमुळे मिळेल अलर्ट
  प्रतीकने सांगितले की, मोटो बड्डी अॅपमध्ये रजिस्टर करताना युजरला स्वतःचे नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि तीन रेफरन्स नंबर रजिस्टर करावे लागतील. रेफरन्समध्ये कुटुंबातील सदस्यांचे नंबर टाकू शकतात. हे अॅप हेल्मेटने कनेक्टेड असेल. हेल्मेटमध्ये चिप लावलेली असेल. एखाद्या बाईकस्वारच्या अपघात झाल्यात चिपच्या माध्यमातून कुटुंबीय आणि हॉस्पिटलला सूचना मिळेल.


  अपघातानंतर प्रतीकला मिळाली नव्हती मदत
  प्रतीकने सांगितले की, वर्ष 2015 मध्ये नोव्हेंबर महिन्यात तो स्कुटीवरून घरी जात असताना त्याची एका बससोबत टक्कर होऊन अपघात झाला. ठेवा एक तासापर्यंत त्याला कोणतीही मदत मिळाली नाही. यामुळे त्याने अशाप्रकारचे अॅप तयार करण्याचा निर्णय घेतला.

 • Helmet To Connect Mobile App
  प्रतीक

Trending