आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात आला Honor 10, oneplus 5T आणि Samsung A8+ ला टक्कर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- हुआवेने आपला नवा स्मार्टफोन Honor 10 भारतात लॉन्च केला आहे. मंगळवारी लंडनमध्ये आयोजित एका समारंभात Honor 10 वरील पडदा दुर करण्यात आला. या फोनमध्ये एआय आणि हायसिलिकन किरिन 970 प्रोसेसर देण्यात आला आहे. भारतात Honor 10 ची एक्सक्लूझिव्ह विक्री ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर बुधवारी सुरू होईल. 

 

 

कंपनीने भारतातील लॉन्चिंगविषयी 2 बाबींचा खुलासा केला आहे. एक म्हणजे 16 मे रोजी रात्री तो उपलब्ध असेल. दुसरी बाब म्हणजे याची विक्री एक्सक्लूसिव्हली फ्लिपकार्टवर होणार आहे. ऑनर 10 फ्लिपकार्टवर  'बिग शॉपिंग डेज़ सेल'च्या शेवटच्या दिवशी विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

 

 

भारतात काय आहे किंमत?
Honor 10 ची भारतातील किंमत 32,999 रुपये आहे. यात यूजरला 6 जीबी रॅम, 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. कंपनीने 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरिएंट भारतात न आणण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

 

काय मिळेल लॉन्च ऑफर? 
Honor 10 च्या लॉन्च ऑफरमध्ये 5,000 रुपयांची अतिरिक्त सूट ऑनर आणि अन्य स्मार्टफोनच्या एक्सचेंजवर मिळणार आहे. कंपनीच्या अन्य डिवाईस सोबत 3,000 रुपयांची नियमित एक्सचेंज वॅल्यू मिळणार आहे. ही एक्सचेंज ऑफर 16-18 मे पर्यंत असेल. ऑनर बजाज फायनान्सच्या कार्डावर नो कॉस्ट ईएमआयची सुविधाही देत आहे. या जिओ यूजर्सलाही ऑफर देण्यात येत आहे. याअंतर्गत 1200 रुपयांची कॅशबॅक, 100 जीबी अतिरिक्त डाटा आणि 3,300 रुपयांचे पार्टनर व्हाऊचर मिळेल. 

 

 

या स्मार्टफोनला टक्कर
भारतीय स्मार्टफोन बाजारात 30,000 ते 40,000 रुपयांच्या सेगमेंटमध्ये स्पर्धा वाढत चालली आहे. या रेंजमध्ये यापूर्वी वनप्लसचे राज्य होते. पण सॅमसंग गॅलक्सी ए 8 प्लस (2018) नंतर आता ऑनर 10 ही आता या सेगमेंटमध्ये सामील झाला आहे.  आयडीसीच्या अहवालानुसार 27,000 ते 40,000 रुपयांच्या सेगमेंटमध्ये ग्रोथ रेट  दरवर्षी 68 टक्के होता. याला कारण सॅमसंग ए 8 प्‍लस शिवाय वन प्लस 5 आणि वनप्‍लस 5T चा शानदार सेल हे कारण होते. दोन्ही कंपन्याच्या स्मार्टफोनमध्ये या रेंजमध्ये जवळपास 50 टक्के मार्केट शेअर होता. परंतु आता 2017 मध्ये सगळ्या वेगवान चिनी कंपनी हुआवे या सेगमेंटमध्ये आली आहे.  

 

 

Honor 10 स्पेसिफिकेशन :-  
 
डिस्प्ले- 5.84 इंच फुल एचडी+ फुल व्ह्यू डिस्प्ले 
रॅम-  6 जीबी 
स्टोरेज- 128 जीबी 
अॅन्ड्रॉयड- 8.1 ओरियो वर आधारित ईएमयूआई 8.1 वर रन करेल 
बॅटरी-  3400 एमएएच (फास्‍ट चार्जि‍ंग सोबत) 
कॅमेरा-  24+16 MP डुअल कॅमरा सैटअप 
फ्रंट कॅमरा- 24 MP 
प्रोसेसर- ऑक्टा-कोर हाईसिलिकन किरीन 970 प्रोसेसर 

किंमत- 32,999 रुपये 

बातम्या आणखी आहेत...