Home | Business | Gadget | honor 7a and honor 7c launch rs 8999 starting price

Honor 7A आणि Honor 7C लॉन्‍च, 8999 रुपये सुरुवातीची किंमत

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 22, 2018, 04:04 PM IST

हुआवेने आपला को-ब्रॅण्ड असणाऱ्या Honor चे दोन स्मार्टफोन Honor 7A आणि Honor 7C भारतात लॉन्च केले आहेत. ऑनरने

 • honor 7a and honor 7c launch rs 8999 starting price

  नवी दिल्ली- हुआवेने आपला को-ब्रॅण्ड असणाऱ्या Honor चे दोन स्मार्टफोन Honor 7A आणि Honor 7 C भारतात लॉन्च केले आहेत. ऑनरने नुकताच आपला प्रीमियम स्मार्टफोन Honor 10 लॉन्च केला होता. Honor 10 च्या लॉन्चच्या वेळी कंपनीने घोषणा केली होती की ते लवकरच स्वस्त किंमतीचे 2 नवे स्मार्टफोन लॉन्च करणार आहेत.

  काय आहे किंमत आणि कधी सुरु होणार विक्री
  कंपनीने ऑनर 7 ए ला 8,999 रुपयावर लॉन्च केले आहे. तर ऑनर 7 सीचे दोन वेरिएंट लॉन्च करण्यात आले आहे. या फोनच्या 3 जीबी रॅम / 32 जीबी स्‍टोरेज असणाऱ्या वेरिएंटची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर फोनच्या 4 जीबी रॅम / 64 जीबी स्‍टोरेज वेरिएंटची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ऑनर 7 ए 29 मे रोजी फ्लिपकार्टवर एक्सक्लूसिव्ह सेलसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ऑनर 7 सी विक्री अमेझॉन इंडियावर सुरू होणार आहे.

  ऑनर 7 ए चे स्‍पेसि‍फि‍केशन

  डिस्प्ले - 5.7-इंच की एचडी+ डिस्प्ले
  रॅम - 3 जीबी
  स्टोरेज - 32 जीबी (256 जीबी एक्‍सपेंडेबल)
  बॅटरी - 3000 mAh
  कॅमेरा - 13 MP + 2 MP डुअल रियर सेटअप
  फ्रंट कॅमरा - 8 MP
  अॅन्ड्रॉयड - ईएमयूआई 8.0 वर आधारित अॅन्ड्रॉयड 8.0 ओरियो वर रन करते
  प्रोसेसर - ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 चिपसेट

  आॅनर 7 सी चे स्‍पेसि‍फि‍केशन

  डिस्प्ले - 5.99-इंच फुल व्ह्यू डिस्प्ले
  रॅम - 3 GB / 4 GB
  स्टोरेज - 32 GB / 64 GB (256 जीबी एक्‍सपेंडेबल)
  बॅटरी - 3000 mAh
  कॅमरा - 13 MP + 2 MP डुअल रियर सेटअप
  फ्रंट कॅमरा - 8 MP
  अॅन्ड्रॉयड - ईएमयूआई 8.0 वर आधारित अॅन्ड्रॉयड 8.0 ओरियोवर रन करतो
  प्रोसेसर - ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट

Trending