Home | Business | Gadget | Cheap Wholesale Market For Laptop In Delhi

भारतातील या मार्केटमध्ये किलोने मिळतात लॅपटॉप, भाव असतो 5000/KG

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 01, 2018, 03:15 PM IST

भारतातील या मार्केटमध्ये तुम्ही नगाने नव्हे, तर चक्क 5000 रुपये किलोप्रमाणे लॅपटॉप खरेदी करू शकता.

 • Cheap Wholesale Market For Laptop In Delhi
  नवी दिल्ली -लॅपटॉपची किंमत त्याच्या कॉन्फिग्रेशनवर अवलंबून असते. लॅपटॉपचे हार्डवेअर कसे आहे, त्यासोबतच कोणत्या कंपनीचा आहे, यावर त्याची साधारणत: किंमत ठरत असते. यानुसार एका लॅपटॉपची किंमत 30 ते 40 हजार रुपयांदरम्यान असायला हवी. मात्र, भारतातील या मार्केटमध्ये तुम्ही नगाने नव्हे, तर चक्क 5000 रुपये किलोप्रमाणे लॅपटॉप खरेदी करू शकता. अन्यथा एक लॅपटॉपसाठी तुम्हाला 7 हजार रुपये मोजावे लागतील. हे लॅपटॉप सेकंडहँड असतात...
  - दिल्ली येथील नेहरू पॅलेसमध्ये भरणाऱ्या या मार्केटला आशियातील सर्वात स्वस्त मार्केट मानले जाते.
  - याठिकाणी लॅपटॉप, स्मार्टफोनसह इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणेही मिळतात.
  - स्मार्टफोनला लागणाऱ्या अॅक्सेसरीजदेखील याठिकाणी मिळतात.
  - नव्यासह जुने गॅजेट्सही याठिकाणी मिळतात. मात्र, तुम्हाला दोहोंतील फरक ओळखता यायला हवा.
  हे ठेवा लक्षात
  - याठिकाणी सेकंडहँडच्या खूप शॉप्स आहेत. त्यामुळे तुम्ही एखादी वस्तू खरेदी करीत असतांना बार्गेनिंग यायलाच हवी.
  - तुमच्यासोबत गॅजेट्सची पारख असलेला व्यक्ती असल्यास सर्वोत्तम.
  - या मार्केटमधून तुम्ही खरेदी करण्यापूर्वी वस्तू तपासून घ्या. त्याशिवाय गॅजेट्चे कॉन्फिग्रेशन तपासून बघा.
  - लॅपटॉप घेण्यापूर्वी काही वेळ तो चालू करून पाहा.
  - नव्या बॉक्समध्ये जुन्या वस्तू दिल्या जात नाही ना, याचीही खबरदारी जरूर घ्या.
  - या मार्केटमधून एकाचवेळी अनेक वस्तू खरेदी केल्यास भरघोस डिस्काऊंटही मिळतो.

 • Cheap Wholesale Market For Laptop In Delhi
 • Cheap Wholesale Market For Laptop In Delhi
 • Cheap Wholesale Market For Laptop In Delhi
 • Cheap Wholesale Market For Laptop In Delhi
 • Cheap Wholesale Market For Laptop In Delhi

Trending