आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुटिलिटी डेस्क:- दिल्लीमध्ये असे एक मार्केट आहे जेथे महागडे लॅपटॉपही किलोच्या भावात विकले जातात. ज्या लॅपटॉपची शोरुममध्ये कमीत कमी 30ते 40 हजार रुपये किंमत आहे. ते लॅपटॉपचे येथे तराजूने वजन करुन विकले जातात. या मार्केटमध्ये चांगल्या स्थितीतील लॅपटॉप तुम्ही फक्त 5 हजार रुपयांत तुम्ही खरेदी करु शकतात. दिल्लीमध्ये हे मार्केट नेहरु प्लेस येथे आहे. तुम्ही येथे 7 हजार रुपये आणि त्यापेक्षाही कमी किंमतीत लॅपटॉप खरेदी करु शकतात.
सेकंड हॅंड असतात लॅपटॉप
दिल्लीच्या नेहरु प्लेस येथे असलेले मार्केट भारतातील सर्वात स्वस्त मार्केट म्हटले जाते. येथे अनेक लॅपटॉप, स्मार्टफोनसोबतच गॅजेट्स आणि डिव्हाइस खरेदी करु शकतात. स्मार्टफोनच्या महत्वाच्या अॅक्सेसिरीजही येथे स्वस्त भावात दिल्या जातात.
हे माहिती असणे आवश्यक
येथे सेकंड हॅंड सामांनाचे अनेक दुकाने आहेत. अशामध्ये कोणतेही सामान घेण्याअगोदर पहिले मार्केटमध्ये अनेक जागावरील किंमत जाणून घ्या. तुम्हाला जर गॅझेट वस्तूंची एवढी माहिती नसेल तर ज्याला चांगल्या प्रकारची माहिती आहेत. त्याला सोबत घेऊन जाऊ शकतात. सेकंड हॅंड किंवा अनेक डिव्हाइस घेण्याअगोदर पहिले त्याला चांगल्या प्रकारे चेक करुन घ्या. पाहिजे तर तुम्ही त्याला अनेक वेळेस ऑन-ऑफ करुनही पाहू शकतात. या गोष्टींकडेही ध्यान ठेवा की, नवीन पॅकिंगमध्ये जुने सामान तर देत नाही.
शॉपकिपरने दिली ही माहिती...
नेहरु मार्केटमध्ये असलेले Netcom कंम्प्युटर्सचे ओनर रजत कपूर यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितले की, आमच्याकडे सेकंड हॅंड लॅपटॉपची रेंज 7 हजारांपासून 60 हजारांपर्यंत आहे. जेव्हा आम्ही अधिक लॅपटॉप (5 ते 6) घेण्याचे बोललो तेव्हा त्यांनी एक्स्ट्रा डिस्काऊंट ऑफरही दिले.
पुढील स्लाइडवर पाहा नेहरु प्लेस येथील मार्केटचे फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.