आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • JIO ANNOUNCES EXCLUSIVE PARTNERSHIP WITH SCREENZ TO CREATE INDIAS LARGEST DIGITAL ENGAGEMENT PLATFORM

JIO ची \'स्क्रिनज\'सोबत भागीदारी; बनणार देशातील सगळ्यात मोठे गेमिंग प्लॅटफाॅर्म

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतात स्क्रीनजसोबत रिलायन्स जिओ इन्फोकाॅम लिमिडेट (जिओ)ने  भागीदारीची घोषणा केली आहे. स्क्रीनज हे मनोरंजनासाठी एक संवाद माध्यम आहे. ज्याचा जगभरात प्रमुख ब्रॉडकास्टर्स वापर करतात. या भागीदारीमुळे जिओच्या गेमिंग प्लॅटफाॅर्मला अच्छे दिन येणार आहेत.

 

 

'जिओ क्रिकेट प्ले अलाॅन्ग' हे 6 कोटी 50 लाखांहुन अधिक युझर्स खेळत आहे. याआधीही 'कौन बनेगा करोडपती प्ले अलाॅन्ग' केबीसी गेम हा घरोघरी पोहोचलाय. घरात बसलेले सर्वसामान्य नागरिकही हा गेम खेळू शकत होते. या भागीदारीमुळे जिओ स्क्रिनज भारतात सर्वात मोठे प्लॅटफाॅर्म बनणार आहे. भारतात मनोरंजक गेमिंगचे हे एकमेव साधन असणार आहे. यामुळे ब्राॅडकास्टर्स आणि पब्लिशर्स चांगले अंगेजिंग कटेंट तयार करू शकेल. गरज भासल्यास याचा दुसऱ्या भागातही नेण्यात येईल. यामुळे  ब्राॅडकास्टर्स आणि युझर्समध्ये लाईव्ह, रिअल टाईम संवादास मदत होईल.

 

 

जिओ स्क्रिनज हे वापरकर्त्यांची वेगळी ओळख आणि प्राफाईल तयार करण्याची क्षमता राखते. ज्यामुळे फक्त विशेष वापरकर्त्यांसाठी चांगले कार्यक्रम तयार करता येतील. सोबतच ब्राॅडकास्टर्सला नवीन जाहिरातीसाठी संधीही मिळेल. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, या ड्यूल स्क्रीनच्या वापरामुळे मोठा बदल पाहण्यास मिळेल. टीव्ही आणि मोबाईलवर जाहिरातीचा नवीन चेहरा पाहण्यास मिळेल.

 

 

मागील काही दिवसांपासून जिओकडून लाँच केलेला हा दुसरा उपक्रम आहे. मागील आठवड्यातच जिओने  JioInteract नावाने जगात पहिला आर्टिफिशियल इंटेलिजेंस बेसड एंगेजमेंट प्लेटफॉर्म लाँच केला होता. 

 

 

जिओ स्क्रिनजचे वैशिष्ट्य

 

 

1) जिओ स्क्रिनजमुळे एखादा टीव्ही शो सुरू असेल तर ब्राॅडकास्टर्स आणि प्रेक्षकाला दोन्हीकडून संवाद साधण्याची सुविधा मिळणार आहे. रिअल टाईममध्ये प्रश्न उत्तर आणि व्होटिंगही करता येईल.

 

2) हे कंटेंट मॅनेजमेंट सिस्टिम (सीएमएस)च्या वापराला अधिक सोपे बनवते. ज्यामुळे ब्राॅडकास्टर्स आणि संवाद साधणारा कंटेंट तयार करण्यात मदत होईल.

 

3) हे अँड्राईड, आयओएस आणि जिओ-काईओएसवर वापरता येईल.

 

4) जिओ स्क्रिनज वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग साईट जसे गुगल, फेसबुक, टि्वटर सारख्या प्लॅटफाॅर्मला सपोर्ट करणार आहे.

 

5) हा रिच डेटा रिपोर्टिंगला सपोर्ट करतोय. प्रत्येक वापरकर्त्याची विशिष्ट प्राफाईल तयार करतो, यामुळे ठराविक गटासाठी जाहिरात करू शकतो.

 

बातम्या आणखी आहेत...