आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकेश अंबानी लॉन्च करणार ब्रॉडबॅन्ड सेवा; या वर्षाच्या शेवटी होणार सुरु

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- रिलायन्स जिओ या वर्षाच्या शेवटी एक मोठा धमका करण्याच्या तयारीत आहे. या वर्षाच्या शेवटी जिओ मोस्ट अवेटेड ब्रॉडब्रॅन्ड सेवा सुरु करणार आहे. या अंतर्गत ग्राहकांना 1000 रुपयात 100mbps इंटरनेट एक्सेस, व्हिडिओ आणि व्हॉइस कॉलिंग सेवा मिळेल. याबाबत जिओच्या सुत्रांनी सांगितले की, या सेवेला आणण्याचे काम जोरात सुरु आहे. पण ही सेवा कधी सुरु होईल याची तारीख आम्ही सांगू शकत नाही. 

 

 

मार्केटहून 20% टक्के स्वस्त प्लॅन
जिओच्या सुत्रांनी सांगितले की, मुकेश अंबानी यांनी आश्वासन दिले की ते बाजारात सध्या असलेल्या ब्रॉडबॅन्ड प्लॅनपेक्षा 20% टक्के स्वस्त प्लॅन  आणणार आहेत. अशात अपेक्षा आहे की त्या प्लॅनची किंमत 1000 रुपयाहून कमी असेल. जिओ या सेवेची चाचणी 2016 पासून घेत आहे.

 

तुमचे घर होईल स्मार्ट
तुम्ही हा प्लॅन घेतल्यास फोनवर डाटा अॅक्सेस करणे, व्हिडीओ कॉलिंग आदी कामे तुम्ही करु शकता. हा प्लॅन बाजारात खळबल माजवेल असे सांगण्यात येत आहे. दिल्ली आणि मुंबई या शहरात 4500 रुपये सुरक्षा अमानत रक्कम म्हणून रिलायन्सने घेतले आणि ब्रॉडबॅन्ड कनेक्शन दिले. या ग्राहकांना 100Mbps चा स्पीड मिळत आहे. fiber-to-the-home (FTTH) आणि Internet of Things (IoT) या सेवेची चाचणी घेण्यात येत असल्याचे जिओकडून सांगण्यात आले. कंपनीचे लक्ष 30 शहरातील 10 कोटी टीव्ही संचापर्यंत पोहचण्याचे आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...