आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

QWERTY की पॅडसह येणार जियोफोन 2, 512 एमबी रॅमसह 4 जीबी स्टोरेज; किंमत फक्त 2,999

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क - रिलायन्स 41 व्या वार्षिक बैठकीत मुकेश अंबानी यांनी हाइएंड जियोफोन लाँच केला. या फोनला मार्केटमध्ये 'जियोफोन 2' अशा नावाने उतरवण्यात आले आहे. फक्त 2,999 रुपये किंमत असलेल्या या फोनमध्ये QWERTY कीपॅडसह एका स्मार्टफोनमध्ये असलेल्या सर्व सुविधा देण्यात येणार आहेत. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे, यात डुअल सिम सुद्धा वापरता येईल. सोबतच या स्मार्टफोनमध्ये जे फीचर्स दिले जात आहेत, ते यापूर्वीच्या जियोफोनमध्ये नव्हते. 

 

15 ऑगस्टपासून विक्री
जियोफोन 2 मार्केटमध्ये 15 ऑगस्टपासून मिळण्यास सुरुवात होईल. या फोनची साइज जुन्या फोन इतकीच आहे. परंतु, त्यामध्ये क्वर्टी की-पॅड देण्यात आल्याने डिझाइनच्या बाबतीत तो ब्लॅकबेरी स्मार्टफोनसारखा दिसून येतो. या फोनमध्ये व्हॉट्सअॅप, फेसबूक आणि युट्यूब असे अॅप्स दिले जातील. हेच अॅप्स जुन्या फोनमध्ये सुद्धा चालतील. 


काय आहे जियोफोन 2 चे फीचर्स?

 

  फीचर्स जियोफोन 2
1. डिस्प्ले 2.4 इंच QVGA
2. कीपॅड क्वर्टी
3. सिम डुअल सिम
4. बॅटरी 2000mAh
5. रॅम 512 एमबी
6. स्टोरेज 4 जीबी (एक्सपँडेबल 128 जीबी पर्यंत)
7. फ्रंट कॅमेरा VGA कॅमेरा
8. रिअर कॅमेरा 2 मेगापिक्सल
9. ओएस KaiOS
10. कनेक्टिव्हिटी एफएम, वाय-फाय, जीपीएस, एनएफसी

बातम्या आणखी आहेत...