Home | Business | Gadget | nokia 6x goes out of stock in 10 second in first sale

10 सेकंदात Out of Stock झाला हा मोबाईल, 30 मे रोजी पुढील सेल

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 22, 2018, 05:49 PM IST

नुकताच लॉन्च झालेल्या नोकिया X6 ;e चा पहिला सेल चीनमध्ये झाला. या सेलमध्ये अवघ्या दहा सेकंदात नोकिया X6 मोब

 • nokia 6x goes out of stock in 10 second in first sale

  गॅजेट डेस्क- नुकताच लॉन्च झालेल्या नोकिया X6 ;e चा पहिला सेल चीनमध्ये झाला. या सेलमध्ये अवघ्या दहा सेकंदात नोकिया X6 मोबाइल आउट ऑफ स्टॉक झाला. या फोनसाठी 7 लाख लोकांनी रजिस्ट्रेशन केले होते. हा फोन JD.com, Suning.com, आणि Tmall.com वर उपलब्ध करुन देण्यात आला होता. या फोनचा दुसरा सेल 30 मे रोजी चीनमध्ये होणार आहे. रजिस्ट्रेशन प्रोसेस ओपन झाली आहे. ग्राहक यात सहभागी होऊ शकतात.

  भारतात लवकरच होणार लॉन्च
  कंपनी लवकरच हा फोन चीनच्या बाहेरही लॉन्च करणार आहे. भारतात हा पुढील 2 महिन्यात लॉन्च होणार आहे. या फोनला भारतात चांगला प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे.

  किंमत- फोनच्या 4GB आणि 32GB वेरिएंटची किंमत 13,800 रुपये आहे. तर 4GB आणि 64GB रॅम वेरिएंटच्या फोनची किंमत 16,000 रुपये आहे. 6 GB आणि 64 GB रॅमच्या फोनची किंमत 18,100 रुपये आहे.

  यासाठी खास आहे हा फोन
  >नोकिया x6 नोकियाचा पहिला असा फोन आहे ज्यात डिस्प्ले नोच देण्यात आला आहे.
  >यात आर्टिफिशियल इंटलीजन्स आणि HDR फीचर आहे.

  >अॅन्ड्रॉइडचे लेटेस्ट वर्जन 8.1 ओरियो यात मिळेल.

  कमी किंमतीत या फोनमध्ये शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात कंपनीने बोथी फीचर दिले आहे. यात यूजर्स फ्रंट आणि रिअर कॅमेराचा एकत्रित वापर करु शकतात. हे फेस अनलॉकला सपोर्ट करते.

  पुढील स्लाईडवर जाणून घ्या दुसरे फीचर्स...

 • nokia 6x goes out of stock in 10 second in first sale

  >फोनमध्ये 16MP आणि 5MP का डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय यात 6 मेगापिक्सलचा सेकेण्डरी कॅमेरा आहे. 
  >यात फोटोग्राफी इम्प्रूव करण्यासाठी AI चे फीचर देण्यात आले आहे. ज्याद्वारे तुम्ही बेस्ट फोटो काढू शकता.
  >या फोनमध्ये 5.8 इंचचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रेज्युलेशन 1080x2280) पिक्सल आहे.
  >फोनमध्ये ऑक्टाकोर स्नेपड्रेगन 636 SoC प्रोसेसर आहे.
  >फोनमध्ये 3060mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की 30 मिनिटात ही बॅटरी 50 टक्के चार्ज होते.

Trending