Home | Business | Gadget | Now Whatsapp Group Admin Can Decide Who Can Send Message In Group

WhatsApp ग्रुप वर कोण पाठवू शकेल मॅसेज हे ठरवण्याचे अधिकार आता अॅडमिनला

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 30, 2018, 04:26 PM IST

नुकतीच ग्रुप अॅडमिनला ग्रुप डिस्क्रिप्शन आणि ग्रुप आयकॉन बदलण्याचा अधिकार देणारे फिचर देण्यात आले होते.

  • Now Whatsapp Group Admin Can Decide Who Can Send Message In Group

    गॅझेट डेस्क - इन्सटंट मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने ग्रुप अॅडमिनसाठी एक नवीन फिचर अॅड केले आहे. या फिचरद्वारे आता ग्रुपमध्ये कोण मॅसेज पाठवू शकेल हे ठरवण्याचा अधिकार ग्रुप अॅडमिनला असेल. सध्या ios साठी हे फिचर सुरू करण्यात आले आहे. लवकरच अँड्रॉइड आणि विंडोज फोन यूझर्ससाठीही ते सुरू केले जाईल. ios च्या 2.18.70 व्हर्जनवर हे फिचर उपलब्ध आहे.


    असे आहे नवे फिचर
    व्हॉट्सअॅपमध्ये ग्रुप सेटिंगमध्ये एक नवीन ऑप्शन 'सेंड मॅसेजेस' जोडले आहे. त्यावर टॅब केल्यानंतर दोन पर्याय मिळतात. पहिला पर्याय 'ऑल पार्टिसिपेंट' म्हणजे, ग्रुपचे सर्व सदस्य मॅसेज पाठवू शकतात. तर दुसरे 'ओन्ली अॅडमिन' यात फक्त ग्रुप अॅडमिन मॅसेज करू शकतो. ग्रुपचे इतर मेंबर फक्त मॅसेज पाहू शकतात, पण त्यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही. पण ग्रुपमध्ये एकच अॅडमिन असेल तरच हे फिचर काम करू शकेल. अन्यथा ग्रुप सेटिंगचे ऑप्शन मिळणार नाही.

Trending