Home | Business | Gadget | online smartphone sale Amazon on second number

SmartPhone : स्मार्टफोन विक्रीत Amazon दुसऱ्या नंबरवर, ही कंपनी ठरली अव्वल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 17, 2018, 08:12 AM IST

काऊंटरपॉईंटने चालू आर्थिक वर्षातील पहिल्या आठवड्यात सर्वाधिक स्मार्टफोन विक्री करणाऱ्या ई-कॉमर्स कपंन्यांची

  • online smartphone sale Amazon on second number

    नवी दिल्ली- चालू आर्थिक वर्षातील पहिल्या आठवड्यात सर्वाधिक स्मार्टफोन विक्री करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांची यादी काऊंटरपॉईंटने जाहीर केली आहे. या यादीत अमेझॉन दुसऱ्या स्थानावर असून फ्लिपकार्ट ही ई-कॉमर्स कंपनी पहिल्या स्थानावर आहे.

    ऑनलाईन माध्यमातून सर्वाधिक स्मार्टफोन खरेदी
    स्मार्टफोन विक्रीत वेगवेगळ्या ई-कॉमर्स वेबसाईट्सची तुलना केल्यास, फ्लिपकार्ट 54 टक्क्यांसह पहिल्या स्थानावर आहे. अमेझॉनचा मार्केट शेअर 30 टक्के असून, अमेझॉन दुसऱ्या स्थानी आहे. तर 14 टक्के मार्केट शेअरसह शाओमी तिसऱ्या स्थानावर आहे. भारतात ऑनलाईन माध्यमातून स्मार्टफोन खरेदीत चार टक्क्यांनी वाढ झाल्याचेही काऊंटरपॉईंटच्या अहवालातून समोर आले आहे. ऑनलाईन माध्यमातून कोणते स्मार्टफोन सर्वाधिक खरेदी केले जाते, याची यादीही काऊंटरपॉईंटने प्रसिद्ध केली आहे. यात अनुक्रमे शाओमी, सॅमसंग आणि हुवावे यांचा क्रमांक लागतो.

Trending