Home | Business | Gadget | Oppo F3 Plus Price Cut : You Can Buy It At 10699 Rupee

22,990 रुपयांचा फोन फक्त 10990 मध्ये, फ्रंटला 2 कॅमेरे, रिअरमध्ये एक

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 25, 2018, 06:35 PM IST

ओप्पोच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. ओप्पोने सेल्फी सेंट्रिक स्मार्टफोन Oppo F3 Plus वर 6000 रुपयांची क

 • Oppo F3 Plus Price Cut : You Can Buy It At 10699 Rupee

  गॅजेट डेस्क- ओप्पोच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. ओप्पोने सेल्फी सेंट्रिक स्मार्टफोन Oppo F3 Plus वर 6000 रुपयांची कपात केली आहे. गतवर्षी हा फोन 22,990 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. पण आता तो 16990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन तुम्ही फ्लिककार्टवरुन खरेदी करु शकता.

  असा मिळेल 10,699 रुपयांमध्ये
  या फोनवर कंपनी 6000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देत आहे. त्यानंतर तुम्हाला हा फोन 10,990 रुपयांमध्ये मिळेल. अॅक्सिस बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डाने फोन खरेदी केल्यास 5% एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल. या फोनवर जिओ सुध्दा 1200 रुपये कॅशबॅक देत आहे. त्यासाठी यूजरला दरमहा 198 आणि 299 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल.

  ओप्पोने भारतीय बाजारात चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. भारतात ओप्पो पाचव्या क्रमांकावर आहे.

  शानदार फीचर्स
  फोनमध्ये 6GB रॅमसोबत 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, फास्ट चार्जिगला सपोर्ट करणारी बॅटरी 15 मिनिटात 2 तासाचा टॉक टाइम देते.

  पुढील स्लाईडवर फोनचे दूसरे फीचर्स...

 • Oppo F3 Plus Price Cut : You Can Buy It At 10699 Rupee

  फीचर्स

   

  > फोनमध्ये 6 इंचाचा फुल एचडी 2.5D कर्व डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचे रेजोल्यूशन 1920X1080 पिक्सल आहे.

  > यात स्नॅपड्रेगन ऑक्टा कोर 653 प्रोसेसर आहे. फोन में 6GB ची रॅम आणि 64GB  इंटरनल स्टोरेज आहे. त्याला माइक्रोएसडी कार्डाद्वारे 256GB पर्यंत वाढविता येते.

  > हा फोन अॅन्ड्रॉइड 6.0 मार्शमैलोवर काम करतो.

  > फोनमध्ये डुअल फ्रंट कॅमेरा आहे. ज्यात एक 16MP चा तर दूसरा 8MP चा आहे.

  > फोन में 16MP चा रियर कॅमरासुध्दा आहे. फोनचे दोन्ही कॅमेरे फोटोग्राफीसाठी बेस्ट आहेत.

   

   

Trending