आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ramzan 2018 : सहरी, इफ्तार आणि तरावीहची योग्य वेळ सांगेल हे मोबाइल अॅप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : रमजान (Ramzan) 17 मे पासून सुरु होत आहे. या निमित्ताने रोजा ठेवणाऱ्या लोकांना सहरी, इफ्तार आणि तरावीहचा योग्य वेळ सांगण्यासाठी एक अॅप सुरु करण्यात आले आहे. हे मोबाइल अॅप इस्लामिक सेंटर ऑफ इंडियाने तयार केले असून याचे नाव 'आय सी आय. रमजान हेल लाईन अॅप.'


इस्लामिक सेंटरचे चेअरमन आणि फरंग महलचे नाजीम मौलाना खालिद रशीद फरंगी महली यांनी दिलेल्या माहितीनुसार या अॅपमध्ये रमजानचे महत्त्व यासोबतच इफ्तार आणि सहरीचा वेळ, शहरातील विशेष मस्जिदमधील तरावीहच्या नमाजची वेळ, शबे कद्रशी संबंधित दुआ समाविष्ट आहेत. या व्यतिरिक्त रोजा, जकात, तरावीह, इफ्तार, सहरी, नमाज आणि इतरही महत्त्वाच्या प्रश्नांच्या उत्तरासाठी अॅपमध्ये वेगळे सेक्शन बनवण्यात आले आहे. या अॅपचा लोकांना खूप फायदा होईल असेही त्यांनी सांगितले. 


जगभरात रोजा ठेवणाऱ्या लाखो-कोटी मुस्लिम बांधवांचा रमजानचा पवित्र महिना 17 मे पासून सुरु होईल. सौदी अरब आणि इंडोनेशियासारख्या मुस्लिम बहुल देशांनी घोषणा केली आहे की, रमजान 16 मे पासून सुरु होणार नाही. चंद्र दिसण्याच्या गणनेनुसार हा महिना सुरु होतो.


रमजानमध्ये रोज ठेवण्याच्या काळात पाणीही पिले जात नाही. इस्लामी कॅलेंडरमध्ये या महिन्याला हिजरी म्हणतात. मान्यतेनुसार हिजरीच्या या संपूर्ण महिन्यात कुराण वाचल्याने सर्वात जास्त सबाब (पुण्य) मिळते.

बातम्या आणखी आहेत...