आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचे स्वस्त TV मार्केट, 32 इंच ब्रॅन्डेड LED TV मिळू शकतो 8500 रुपयात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- स्वस्त मार्केट सिरीजमध्ये आम्ही तुम्हाला स्वस्त TV मार्केटची माहिती देत आहोत. या बाजारात तुम्हाला सॅमसंग ते सोनी असे ब्रॅन्डेड LED TV  अर्ध्या किंमतीत मिळत आहेत. हे मार्केट दिल्लीत मौजपूरमध्ये आहे. तुम्हा याठिकाणी मेट्रोद्वारे पोहचू शकता. येथून जब्फराबाद मेट्रो स्टेशन जवळ आहे. येथे  6000 रुपयात LED TV मिळत आहे. 

या मार्केटमध्ये काही अशी दुकानेही आहेत जेथून कुरियरच्या माध्यमातून सामान घरी मागवू शकता. तुम्ही कॅ्श आणि पेटीएमच्या माध्यमातून पेमेंट करु शकता. येथे तुम्हाला टीव्हीवर एक वर्षाची वॉरंटीही मिळू शकते. 

 

 

याबाबत मलिक इलेक्ट्रॉनिक्सचे शाहरूख मलिक यांना विचारले असता ते म्हणाले की, येथे टीव्ही व्यतिरिक्त फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, मायक्रोवेव्ह अर्ध्या किंमतीत मिळतात. हे इलेक्ट्रॉनिक्सचे एक मोठे मार्केट आहे. येथे सेकेंड हॅण्डसोबत नवे डिफेक्ट असलेले प्रोडक्ट मिळतात. येथे अशा स्वरुपाची जवळपास 40 दुकाने आहेत. 

 

 

या बाजारात स्वस्त टीव्ही का मिळतात
>या मार्केटमध्ये असे टीव्ही विकले जातात जे स्क्रॅच आणि डेंट झालेले आहेत. 
>32 इंच LED TV तुम्हाला 8500 रुपयात मिळेल. बाजारात याची किंमत 18 हजार रुपये आहे. 

>येथे तुम्हाला सेकंड हॅंण्ड टीव्हीची मोठी रेंजही मिळू शकते.

 

 

काय असतात किंमती
>24 इंच LED TV तुम्हाला येथे 6500 

रुपयात मिळेल. बाजारात याची किंमत 

12 ते 13 हजार रुपये आहे.

>55 इंच स्मार्ट 4K TV तुम्हाला 28 

हजार रुपयात मिळेल.
>32 इंचाचा स्मार्ट टीव्ही तुम्हाला 

12000 रुपयात मिळत आहे.
>50 इंचाचा मायक्रोमॅक्सचा टीव्ही 20 

हजार रुपयात मिळेल. 

 

 

सेकंड हॅण्ड टीव्ही
32 इंची सेकंड LED टीव्ही तुम्हाला  

6000 ते 7000 रुपयात मिळेल. टीव्ही खराब दुकानदार ते तुम्हाला दुरुस्त करुन देतात. 40 इंच टीव्ही येथे 12000 रुपयात मिळतो.

 

पुढील स्लाईडवर VIDEO

 

बातम्या आणखी आहेत...