Home | Business | Gadget | Sony launches fast speed 3.1 Gen 1 flash drive line-up to help in effective workflow

डाटा शेअरिंगसाठी सोनीकडून फास्ट स्पीड ३.१ जेन १ फ्लॅश ड्राईव्ह श्रृंखला

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 10, 2018, 03:31 PM IST

सध्या अस्तित्वात असलेल्या डाटा शेअरिंग मागणीला अनुसरून सोनी इंडियाने अतिशय वेगाने डाटा शेअरिंग आणि ट्रांसफरसाठी आज USM-B

 • Sony launches fast speed 3.1 Gen 1 flash drive line-up to help in effective workflow

  मुंबई- सध्या अस्तित्वात असलेल्या डाटा शेअरिंग मागणीला अनुसरून सोनी इंडियाने अतिशय वेगाने डाटा शेअरिंग आणि ट्रांसफरसाठी आज USM-BA2, USM-CA2 आणिUSM-MX3 ह्या आपल्या नवीनतम मेड इन इंडिया युएसबी फ्लॅश ड्राईव्ह्‌सची सुरूवात केली आहे.

  मेटालिक आणि अॅन्टिकॉरोसिव्ह सुपरस्पीड ३.१ जेन १

  तीनही मॉडेल्स मेटालिक, अॅन्टि कॉरोसिव्ह आणि सुपरस्पीड ३.१ जेन १ सोबत पूर्तता करणारी असून प्रभावी कार्यप्रवाहासाठी यांमुळे मोठ्‌या मीडिया फाईल्ससुद्धा एखाद्याच्या पीसीमध्ये काही सेकंदांमध्ये ट्रांसफर केल्या जाऊ शकतात. सर्व ग्राहक गरजांची पूर्तता करण्यासाठी वेगवान आणि टिकाऊ डिव्हायसेस आणण्याच्या सोनीच्या निष्ठेचे प्रतिबिंब ह्या युएसबी फ्लॅश ड्राईव्हमधून दिसून येते.

  छोटेखानी, स्लीक आणि मेटल बॉडी डिझाईन

  यातील मेटल बॉडीसह स्लीक डिझाईन रास्त किंमतीत स्टाईल प्रदान करते. कुठलाही डाटा सुरक्षित राखण्यासाठी हा पुरेसा दणकट आणि टिकाऊ आहे. याव्यतिरिक्त, ह्या युएसबी फ्लॅश ड्राईव्ह्‌सचा छोटेखानी आकार त्यांना कमी जागेतही काम करण्यासाठी उत्तम बनवतो आणि उपयोगकर्त्यांना आजूबाजूच्या पोर्ट्‌सनाही सहजपणे अॅक्सेस मिळवता येतो.

  USM-MX3 सीरीज हा लहान आकाराचा हाताळण्यास सोपा युएसबी फ्लॅश ड्राईव्ह असून यातील मॅट फिनिश असलेल्या पार्ट्‌समुळे बोटांमध्ये युएसबी फ्लॅश ड्राईव्ह व्यवस्थित घट्ट पकडता येतो. ह्या नवीनतम सीरीजमध्ये ते सहजपणे कॅरी करण्यासाठी स्ट्रॅप-होल आणि मॅट प्लास्टिक ग्रिपही आहे.

  ड्युअल पोर्ट ब्रिजसह सुधारित अनुरूपता

  USM-BA2 सीरीज आणि USM-CA2 सीरीज हे ऑन-दि-गो युएसबी फ्लॅश ड्राईव्ह आहेत. अनेक डिव्हाईसना ट्रांसफर करण्यासाठी सुसज्ज USM-BA2 सीरीजमध्ये ड्‌युअल-पोर्ट ब्रिज असून त्यात मायक्रो युएसबी आणि युएसबी टाईप-ए पोर्ट्‌सही आहेत. USM-CA2 सुद्धा ड्‌युअल-पोर्ट ब्रिजला समर्थन देतो, त्यातही दोन्ही युएसबी टाईप-सी™ आणि ए पोर्ट्‌स विभिन्न डिव्हायसेससोबत अनुरूपतेसाठी आहेत.

  USM-BA2 सीरीज ही युएसबी टाईप-ए पोर्ट असलेल्या विंडोज® पीसी, मॅकिंतोश®, अॅन्ड्रॉईडटTM स्मार्टफोन आणि टॅबलेटसोबत अनुरूप आहे. तर USM-CA2 सीरीज युएसबी टाईप सी / टाईप ए पोर्ट असलेल्या विंडोज® पीसी, मॅकिंतोश® अॅन्ड्रॉईडटTM स्मार्टफोन आणि क्रोमबूक पिक्सेलसोबत अनुरूप आहे. हे युएसबी फ्लॅश ड्राईव्ह युएसबी २.० पेक्षा चौपट अधिक वेगवान आहेत. USM-BA2 खास केवळ फ्लिपकार्टवर आणि USM-CA2 आणि USM MX3 हे सर्व सोनी सेंटर्समध्ये उपलब्ध असतील.

  Model

  Capacity

  Availability

  Colour

  MRP

  USM-BA2

  16GB, 32GB, 64GB and 128GB

  12th May’18

  Silver

  Rs.950, Rs.1285, Rs.1959, Rs.6400

  USM-CA2

  16GB, 32GB, 64GB and 128GB

  12th May’18

  Silver

  Rs.1200, Rs.1800, Rs.3900, Rs.9210

  USM MX3

  16GB, 32GB, 64GB and 128GB

  12th May’18

  Gold

  Rs.850, Rs.1800, Rs.3500, Rs.5840

Trending