आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Tech News Jio And Airtel Users Can Get Free Live Streaming Of Fifa World Cup 2018

FIFA World Cup 2018: जिओ, Airtel कस्टमर्स पाहू शकणार FREE Live स्ट्रीमिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्या आपल्या युजर्सना फिफाचे स्ट्रीमिंग मोफत दाखवणार आहेत. युजर्स आपला लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर टीव्हीला जोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू शकतील. याशिवाय एअरटेल युजर्सना फक्त आपले एअरटेल टीव्ही अॅप अपडेट करायचे आहे. अपडेट केल्यानंतर एअरटेल टीव्ही अॅपवर युजर्सना फिफा वर्ल्ड कप 2018 पाहण्याचा पर्याय मिळणार आहे.

 

 

Jio Tv वर Live स्ट्रीमिंग पाहण्यासाठी

1. कोणत्याही ब्राऊझरवर जाऊन jioTV असे टाकावे

2. यावर येणाऱ्या लॉगइन बटणावर क्लिक करावे. वर उजव्या बाजूला हे बटण दिसेल.

3. त्यानंतर तुम्हाला jio ID टाकावा लागेल.

4. मग तुम्हाला अनेक चॅनेल्सची यादी दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर फिफा वर्ल्ड कप 2018 मॅच पाहता येणार आहे.

 

एअरटेल, जिओ आणि बीएसएनएलने फिफा वर्ल्ड कपसाठी स्पेशल रिचार्ज ऑफर आणले आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...